कृषी विभागाच्या वतीने मका पिकावर फवारणी प्रशिक्षण शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:42 PM2020-08-12T17:42:29+5:302020-08-12T17:43:46+5:30

इगतपुरी : सोमवारी कृषि विभाग आत्मा योजने अंतर्गत कौशल्य आधारित काम करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्र म अंतर्गत तालुक्यातील भरविर बु. येथील संजय झनकर मळ्यात मका पिकावर फवारणी करणाºया शेतकरी, शेतमजुरांचे दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते.

Spray training camp on maize crop on behalf of Agriculture Department | कृषी विभागाच्या वतीने मका पिकावर फवारणी प्रशिक्षण शिबीर

मका पिकावर फवारणी व विविध माहीतीचे मार्गदर्शन करतांना कृषी अधिकारी शितलकुमार तवर.

Next
ठळक मुद्देभरवीर बुद्रुक भंडारदरावाडी या गावातील सुमारे ६० शेतकरी उपस्थित होते.

लोकमत न्युज नेटवर्क
इगतपुरी : सोमवारी कृषि विभाग आत्मा योजने अंतर्गत कौशल्य आधारित काम करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्र म अंतर्गत तालुक्यातील भरविर बु. येथील संजय झनकर मळ्यात मका पिकावर फवारणी करणाºया शेतकरी, शेतमजुरांचे दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात आले. या कार्यक्र मासाठी भरवीर बुद्रुक भंडारदरावाडी या गावातील सुमारे ६० शेतकरी उपस्थित होते.
शेतकºयांनी मकावरील कीड ओळख व त्यावरील कीडनाशक फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, विषबाधा टाळण्यासाठी उपाय योजनेसाठी वापरावयाचे कोट, हात मोजे, चष्मा आदी साहित्य कसे वापरावे याबाबतची माहिती इगतपुरी तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तवर यांनी दिली. तसेच किटचे वाटप करु न काही तक्र ारी असल्यास कृषि कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन केले. यावेळी कृषी खात्याच्या विविध योजनेसंदर्भात माहिती देत शेतकºयांनी रासायनिक खते, औषधे, बियाणे कसे खरेदी करावी, काय काळजी घ्यावी, तक्र ार कोणाकडे करावी याबाबत इगतपुरी पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी मोगल यांनी माहिती दिली.
मंडळ कृषी अधिकारी किशोर भरते यांनी कृषी विभागातील यांत्रिकीकरण व बाकी योजेनची माहिती दिली. तर मच्छिंद्र दराडे, गोरख गाईकर यांनी रासायनिक औषधी विषयी माहिती दिली. सुत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक संजय पाटील यांनी केले. हितेंद्र मोरे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी कृषी सहाय्यक बिन्नर, संजय झनकर, साहेबराव झनकर, शिवाजी झनकर, भगवान जुंद्रे, धनाजी झनकर, विष्णू झनकर, आकाश झनकर, ऋ षिकेश झनकर, जगन गोडे, दिनकर सोनवणे, एकनाथ जूनदरे, पंकज कांकरीया, राधाकिसन जनकर आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव यांनी आभार मानले.
 

Web Title: Spray training camp on maize crop on behalf of Agriculture Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.