मिनिमॅराथॉनमध्ये उत्स्फुर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 02:50 PM2020-01-19T14:50:09+5:302020-01-19T14:52:47+5:30

१२ वी मिनि मॅरॉथॉन रविवारी(दि.१९) सकाळी सिडको येथील राजे संभाजी स्टेडियम येथे पार पडली. यावेळी शहरासह उपनगरांतील नागरिकानी या मिनी मॅराथॉनमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

Spontaneous participation in the minimarathon | मिनिमॅराथॉनमध्ये उत्स्फुर्त सहभाग

मिनिमॅराथॉनमध्ये उत्स्फुर्त सहभाग

googlenewsNext
ठळक मुद्देमिनी मॅराथॉनमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.विविध समाजाला एकमेकांशी जोडणे व मुलांना खेळाडु बनविणे’लहान मुलांची संख्या लक्षणीय होती

नाशिक :रोटरी क्लबनाशिक-अंबड आणि सपकाळ नॉलेज हब आयोजित १२ वी मिनि मॅरॉथॉन रविवारी(दि.१९) सकाळी सिडको येथील राजे संभाजी स्टेडियम येथे पार पडली. यावेळी शहरासह उपनगरांतील नागरिकानी या मिनी मॅराथॉनमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
     रोटरी क्लब आणि सपकाळ नॉलेज हब या १२ व्या मिनिथॉनच्या माध्यमातून ‘विविध समाजाला एकमेकांशी जोडणे व मुलांना खेळाडु बनविणे’ या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सपकाळ नॉलेज हबचे संचालक डॉ. रविंद्र सपकाळ, अरविंद पाटील, प्रदीप देशमुख, एच. एच. बॅनर्जी, विकास शेलार, संजय घलावत, संतोष दळवी, डॉ. मनोज चोपडा, मिलींद जांबोटकर, निखिल राऊत, डी. के. झरेकर उपस्थित होते. या १२ व्या मिनि मॅराथॉनमध्ये शहरातील विविध भागातून आलेल्या सुमारे ४ हजार नागरिकांनी यात सहभाग नोंदविला. १२ ते १४ वयोगटातील मुला-मुलींसाठी २ किमी, १५ ते १७ वयोगटासाठी ३ किमी, १८ वर्ष व त्यापुढील सर्व वयोगटातील मुलींकरीता ५ किमी तर मुलांकरीता ७.५ किमी याप्रमाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅराथॉनसाठी पहाटे पासूनच नागरिकांनी हजेरी लावत स्पर्धेचा आनंद घेतला. यावेळी लहान मुलांची संख्या लक्षणीय होती. या मिनिमॅराथॉनमध्ये हिरामन थवील (सुरगाणा) भारत बेंडकोळी (केबीएच शाळा, गिरणारे),अनुसया पारधी (केबीएच शाळा, गिरणारे), वैष्णवी कातोरे (विद्या प्रबोधिनी शाळा), आरती थेटे (केबीएच शाळा, गिरणारे), हृषिकेश उगलमुगले (वेहेळगाव) यांची विविध वयोगटात प्रथम क्रमांक पटाविला. यावेळी अध्यक्ष संतोष भट, जयंत पवार, टी. एच. पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी रविद्र नाईक, सचिव दिपक तावडे, जयंत पवार, विपुल लोडया, हेमंत पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Spontaneous participation in the minimarathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.