मजूरांअभावी यंत्राद्वारे भातकाढणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:49 PM2019-11-14T12:49:42+5:302019-11-14T12:49:59+5:30

नांदूरवैद्य -: इगतपुरीच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कु-हे, नांदगांव बुद्रुक, गोंदे दुमाला, जानोरी आदी भागात भातकाढणीची कामे मजूर मिळत नसल्याने यंत्रानेच केली जात आहे.

 Speeding of paddy harvesting by labor intensive machines | मजूरांअभावी यंत्राद्वारे भातकाढणीला वेग

मजूरांअभावी यंत्राद्वारे भातकाढणीला वेग

googlenewsNext

नांदूरवैद्य -: इगतपुरीच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कु-हे, नांदगांव बुद्रुक, गोंदे दुमाला, जानोरी आदी भागात भातकाढणीची कामे मजूर मिळत नसल्याने यंत्रानेच केली जात आहे. इगतपुरीच्या पूर्व भागात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मुख्य पिक असलेल्या भात काढणीच्या कामांना सुरु वात झाली आहे.परिसरातील शेतकऱ्यांची मजूरांसाठी लगबग सुरु झाली आहे. शेतकऱ्यांची मजूर मिळण्यासाठी रस्सीखेच होतांना दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी भातशेतीत साचलेले असल्यामुळे मजूरांना मोठी कसरत करावी लागत असल्याने परिसरातील मजूर अधिक रोज मागत आहे. याच पाशर््वभूमीवर परिसरातील शेतकºयांनी यावर्षी भातकाढणीची व मळणीची कामे यंञानेच करण्याचे ठरविले असून परिसरात अनेक ठिकाणी ही यंञे उपलब्ध झाली आहेत. भात मळणीयंञ म्हणजे शेतकºयांसाठी वरदानच ठरले आहे.या यंञाद्वारे भाताची मळणी करणे करणे अधिक सोपे झाले आहे. या यंञाच्या माध्यमाने एका तासामध्ये ३०० किलो भाताची मळणी होते.दिवसाला आठ तास मशिन चालल्यास साधारणत: २.५ टन भाताची मळणी करता येते.यामुळे शेतकºयांचा मनुष्यबळासाठी लागणारा खर्च कमी होतो.गावात एक मळणीयंञ उपलब्ध झाल्यास मजूरटंचाई दूर होण्यास मदत होईल. यावर्षी पावसाने आॅक्टोबर - नोव्हेंबर महिन्यापर्यंत जोर धरल्यामुळे अजूनही काही परिसरातील भातशेतीमध्ये पाणी साचलेले असल्यामुळे या ठिकाणी भातकाढणीचे काम हे मजूरांशिवाय होऊच शकत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.मजूर मिळाले तरी त्यांना ते मागतील तसा रोज द्यावा लागत असल्याने या ठिकाणी शेतकºयांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

Web Title:  Speeding of paddy harvesting by labor intensive machines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक