कोरोना संदर्भात चर्चेसाठी नाशिक महापालिकेची गुरुवारी विशेष महासभा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 02:47 PM2020-06-21T14:47:47+5:302020-06-21T14:51:43+5:30

नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्या गुरुवारी (दि 25) विशेष महासभा बोलावली आहे.

Special general meeting of Nashik Municipal Corporation on Thursday for discussion regarding Corona | कोरोना संदर्भात चर्चेसाठी नाशिक महापालिकेची गुरुवारी विशेष महासभा  

कोरोना संदर्भात चर्चेसाठी नाशिक महापालिकेची गुरुवारी विशेष महासभा  

Next
ठळक मुद्देनाशिक महापालिकेची पुन्हा ऑनलाईन महासभा कोरोना संदर्भात चर्चेसाठी महासभेचे आयोजन नगरसेवकांना मोबाईसल अ‍ॅपवरून सहभागी होता येणार

नाशिक :   कोरोना संदर्भात चर्चेसाठी नाशिक महापालिकेची गुरुवारी विशेष महासभा शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून बधितांची संख्या हजाराहून अधिक झाली आहे तर 55 पेक्षा अधिक रुग्णांचे बळी गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्या गुरुवारी (दि 25) विशेष महासभा बोलावली आहे.

महासभा ऑनलाइन पद्धतीने होणार असून नगरसेवकांना अ‍ॅप वरून त्यात सहभागी होता येईल शहरात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. महापालिकेचे प्रशासन त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करीत असले तरी यासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या सूचना देखील महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या महासभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहे.त्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असून महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक उपायययोजना करण्याच्या संदर्भात या महासभेत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Special general meeting of Nashik Municipal Corporation on Thursday for discussion regarding Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.