अंदरसुल उपबाजार येथे सोयाबीन, मका व भुसारधान्य लिलाव सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 06:33 PM2020-10-26T18:33:32+5:302020-10-26T18:34:08+5:30

अंदरसुल : येथील बाजार समिती उपबाजार येथील कॉटन मार्केट मध्ये हंगाम सन 2020-21 करीता मका, सोयाबीन व भुसारधान्य खरेदीचा शुभारंभ बाजार समितीच्या सभापती सौ. उषाताई शिंदे व भुजबळ संपर्क कार्यालयाचे प्रमुख बाळासाहेब लोखंडे यांचे हस्ते करण्यात आला.

Soybean, Maize and Cereal Auctions started at Andarsul Sub Bazaar | अंदरसुल उपबाजार येथे सोयाबीन, मका व भुसारधान्य लिलाव सुरु

अंदरसुल उपबाजार येथे सोयाबीन, मका व भुसारधान्य लिलाव सुरु

Next
ठळक मुद्दे 30 वाहनातून सोयाबीन व मका विक्रीस आला होता.

अंदरसुल : येथील बाजार समिती उपबाजार येथील कॉटन मार्केट मध्ये हंगाम सन 2020-21 करीता मका, सोयाबीन व भुसारधान्य खरेदीचा शुभारंभ बाजार समितीच्या सभापती  उषाताई शिंदे व बाळासाहेब लोखंडे यांचे हस्ते करण्यात आला.
             उपबाजार आवारावर ट्रॅक्टर व पिकअप असे एकुण 30 वाहनातून सोयाबीन व मका विक्रीस आला होता. सर्वप्रथम शेतकरी गोकुळ निवृत्ती सोनवणे यांचा टोपी व उपरणे देवून सत्कार करण्यात आला. सोनवणे यांनी ट्रॅक्टर या वाहनातुन आणलेल्या मकास रु. 1311/- प्रति क्विंटल इतका भाव मिळाला.
सोयाबीनचे बाजारभाव किमान रु. 4151/- ते कमाल रु. 4201/- तर सरासरी रु. 4153/- पर्यंत होते. तर मकाचे बाजारभाव किमान रु. 1024/- ते कमाल रु. 1311/- तर सरासरी रु. 1200/- प्रति
क्विंटल पर्यंत होते.
येथील उपबाजार आवारावर मका व भुसाराान्य लिलाव सुरु झाल्यामुळे अंदरसुल परिसरातील शेतकर्‍यांची जवळच्या ठिकाणी मका व भुसारधान्य विक्रीची चांगली सोय झाली आहे. तसेच शेतीमालाचे रोख पेमेंट मिळणार असुन शिवार व खेडा खरेदीतुन होणारी वजनातील फसवणुक टाळली जाणार आहे.

उपबाजार अंदरसुल येथे आठवडातुन सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार असे पाच दिवस लिलाव चालु राहणार असल्याने अंदरसुल परिसरातील शेतकरी बांधवांनी आपला मका, सोयाबीन व इतर भुसारधान्य उपबाजारात वाळवुन व स्वच्छ करुन विक्रीस आणावे तसेच चांगले बाजारभाव मिळणेसाठी आपला शेतीमाल बाजार समिती मयेच विक्री करावा असे आवाहन बाजार समिती सभापती सौ. उषाताई शिंदे, उपसभापती गणपतराव कांदळकर, अंदरसुल उपबाजार समितीचे सभापती मकरंद सोनवणे, सचिव के. आर. व्यापारे व संचालक मंडळाने केले आहे.
           कार्यक्रमास बाजार समितीचे संचालक नवनाथ काळे, कृष्णराव गुंड, नंदकिशोर आट्टल, गोरख सुराशे, मनिषा जगताप, दिपक जगताप, कैलास जगताप, भाऊसाहेब गायकवाड, गजानन देशमुख, कांदा व्यापारी भिकाशेठ एंडाईत, विलास गाडे, सुभाष आट्टल, सुनिल आट्टल, अभिजीत काले, रामनाथआप्पा लिंगायत, शिवाजी ढोले, निवृत्ती ढोले, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर माळी, लक्ष्मण वडाळकर, अरुण जेजुरकर, संजय ढोले, तुळशीदास सोनवणे, संतोष दाभाडे, अरुण सोनी, गौरव दिघे, राहुल दायमा, ज्ञानेश्वर भागवत आदींसह शेतकरी, बाजार समिती कर्मचारी, माथाडी उपस्थित होते.

 

Web Title: Soybean, Maize and Cereal Auctions started at Andarsul Sub Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.