इनरव्हीलच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 05:00 PM2021-01-16T17:00:31+5:302021-01-16T17:01:14+5:30

कळवण : इनरव्हील क्लब ऑफ कळवणच्या वतीने ह्य इनरव्हील डेह्ण साजरा करण्यात आला.

Social activities through Innerwheel | इनरव्हीलच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम

इनरव्हील क्लबच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी सिमेंटचे बाक लोकार्पण करतांना सुनीता पगार, निर्मला संचेती, मीनाक्षी मालपुरे, नयना पगार रेखा सावकार, निशा कोठावदे आदी.

Next
ठळक मुद्देदेवी मंदिर गणेश नगर, दत्त मंदिर बस स्थानक, विठ्ठल मंदिर आवारात सिमेंटचे बाक मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण.

कळवण : इनरव्हील क्लब ऑफ कळवणच्या वतीने ह्य इनरव्हील डेह्ण साजरा करण्यात आला.
                   इनरव्हील क्लबच्या माध्यमातून कळवण शहरात व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून राहून अध्यक्ष स्नेहा मालपुरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कळवण नगरपंचायतीचे प्रथम महिला माजी नगराध्यक्षा सुनिता पगार यांनी यावेळी केले.
                    अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लब ऑफ कळवणच्या अध्यक्ष स्नेहा मालपुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक भाग्यश्री पगार, कमको बँकेचे माजी चेअरमन संजय मालपुरे हे होते. यावेळी मालपुरे यांनी इनरव्हील क्लब व ग्रुपच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती देऊन आगामी काळात कोणते उपक्रम राबवण्यात येणारे याची माहिती दिली.इनरव्हील क्लबच्या माध्यमातून देवी मंदिर गणेश नगर, दत्त मंदिर बस स्थानक, विठ्ठल मंदिर आवारात सिमेंटचे बाक मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
                     यावेळी निर्मला संचेती, महानंदा अमुतकार, लता वेढणे, रेखा सावकार, निशा कोठावदे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक नयना पगार. सुत्रसंचालन मीनाक्षी मालपुरे यांनी तर भार निर्मला संचेती यांनी मानले.

 

Web Title: Social activities through Innerwheel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.