...म्हणून नाशिकचा गवळीपाडा झळकला राज्यात दुसऱ्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 04:25 PM2019-07-27T16:25:09+5:302019-07-27T16:30:23+5:30

जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे.

... so Gavalipada of Nashik is set to be ranked second in the state | ...म्हणून नाशिकचा गवळीपाडा झळकला राज्यात दुसऱ्या स्थानावर

...म्हणून नाशिकचा गवळीपाडा झळकला राज्यात दुसऱ्या स्थानावर

googlenewsNext
ठळक मुद्दे ठिकठिकाणी रोपवन करून ते यशस्वीरीत्या गावकऱ्यांनी सांभाळले. गवळीपाडा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय ३६७ हेक्टर वनक्षेत्रावर कु-हाड, चराईबंदी यशस्वीरित्या केली

नाशिक : ‘हजार हातांनी देणा-या वनांची पुण्याई, वन आहे नद्यांची आई...’ असे म्हटले जाते ते अगदी खरे आहे. दिवसेंदिवस वनजमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला असून नैसर्गिक ऋुतूचक्रही बिघडले आहे. याची जाणीव ठेवत वनांचे महत्त्व लक्षात घेता जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातीनल ननाशी वनपरिक्षेत्रातील गवळीपाडा (महाजे) या गावाने वनसंवर्धन करत ३६७ हेक्टर वनक्षेत्रावर कु-हाड, चराईबंदी यशस्वीरित्या केली. तसेच २०१४-१५साली ७५ हेक्टरवर रोपवनदेखील विकसीत केले. राज्य शासनाच्या वनमहोत्सवांतर्गत ७५ हेक्टरवर पुन्हा या गावाने रोपवन घेतले. तसेच जल व मृदा संधारणाची कामे वनविभागाच्या साथीने पुर्ण केल्यामुळे गवळीपाड्याला संत तुकाराम वनग्राम योजनेत जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळविता आला.
गवळीपाडा (महाजे) या भागातील लोकसहभागातून वनजमिनींवरील अतिक्रमणे काढण्यात आली. साग फुटव्यांचे संरक्षण करून साग जंगलात रूपांतर झाले. ठिकठिकाणी रोपवन करून ते यशस्वीरीत्या गावकऱ्यांनी सांभाळले. त्यामुळे गवळीपाडा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवू शकला. संत तुकाराम वनग्राम योजनेसाठी हे गाव पुढील वर्षासाठी राज्यस्तरीय फेरीकरिता पात्र झाले आहे. पश्चिम भागामधील विविध वनपरिक्षेत्रात अशा पद्धतीने लोकसहभागातून वनविकास आणि निसर्ग संवर्धन केले जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे यांनी दिली.
जल मृदसंधारणाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊ लागली. त्यामुळे बागायती पिकांचे उत्पादन आदिवासी शेतक-यांना घेणे शक्य होत आहे. जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे.
२०११-१२ सालापासून येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नागरिकांनी पुढाकार घेत ३६७ हेक्टर क्षेत्रावर चराई, कुºहाडबंदी करून वनसंवर्धनासाठी प्रयत्न केले. वनविभागाकडून सोपविण्यात आलेल्या या क्षेत्राची उत्कृष्ट पद्धतीने देखभाल करत क्षेत्रावरील वनविकास व संवर्धन करण्यावर भर दिला. वनपरीक्षेत्र अधिकारी रविंद्र भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सचिव वनपाल आर.व्ही.देवकर,वनरक्षक हिरामण चौधरी यांनी लोकसहभागातून २०१४-१५साली वनविकास यंत्रणा योजनेअंतर्गत ७५ हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेतले. शासनाच्या महत्त्वाकांक्षी ५० कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत २० हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेण्यात आले. तसेच जल व मृद संधारणाची कामेही करण्यावर भर दिला. जुन्या साग रोपवनाचेही संवर्धन यशस्वीपणे केले. त्यामुळे गवळीपाडा जिल्हास्तरावर संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. या समितीला ५१ हजार रुपयांचे बक्षीसही मिळाले.

...असे केले निसर्गसंवर्धन
जंगल राखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार
दरवर्षी हजारो रोपांची लागवड अन् संवर्धन
जंगल परिसरात समतल चर खोदून पाणी अडविले.
वनतळे, बंधारे, दगडी नाले बांधून जलमृदा संधारणाची कामे प्राधान्याने केली.
जंगलात होणारी घुसखोरी थांबविली.
चराई व कु-हाडबंदीचा निर्णय एकत्रित घेत अमलात आणला.

 

Web Title: ... so Gavalipada of Nashik is set to be ranked second in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.