'Smart' action: Nashik police warn criminals to 'understand, improve' | ‘स्मार्ट’ कारवाई : नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांना ‘समझ जाओ, सुधर जाओ’चा इशारा

‘स्मार्ट’ कारवाई : नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांना ‘समझ जाओ, सुधर जाओ’चा इशारा

ठळक मुद्देपरिमंडळ-२च्या कार्यक्षेत्रातील ३३१ गुंडांचा समावेश मध्यवर्ती कारागृहात ९ गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यात आले ५५ गुंड शहराच्या परिमंडळ-२मधून तडीपार

नाशिक : विधानसभा निवडणूकीचे मतदान येत्या सोमवारी (दि.२१) करण्यासाठी अवघे नाशिक सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहराची कायदासुव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ५५५ लोक ांना शहरात वास्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये परिमंडळ-२च्या कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांमधील ३३१ गुंडांचा समावेश आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा मतदानाचा हक्क प्रशासनाने अबाधित ठेवला आहे.
विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहर व परिसरात सर्वत्र शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. अतिरिक्त वाढीव पोलीस बंदोबस्तासह निमलष्करी दलाच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. गुन्हेगारांचा पूर्वइतिहास लक्षात घेत गंभीर स्वरूपाच्या शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या गुंडांना थेट जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. आदर्श आचारसंहितेच्या महिनाभराच्या कालावधीत एकूण ५५ गुंडांना शहराच्या परिमंडळ-२मधून तडीपार करण्यात आले आहे. तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ३३१ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी शनिवारी (दि.१९) सायंकाळी ५ वाजता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून काढता पाय घ्यावा, असे आदेशात म्हटले आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सोमवारी (दि.२१) मतदानासाठी दुपारी २ वाजता शहरात येण्यास हरकत नसल्याचे मनाई आदेशात पोलिसांनी स्पष्ट केले आहे; मात्र मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पुन्हा मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी (दि.२४) शहर सोडणे बंधनकारक असल्याची माहिती उपआयुक्त विजय खरात यांनी दिली. तसेच सातपूरमधील संघटितपणे गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या कल्पेश दिपक वाघ याच्यासह त्याच्या साथीदारांनाही शहरासह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्याचबरोबर ९ गुन्हेगारांविरूध्द पोलीस आयुक्त विश्वास नागंरे पाटील यांच्या आदेशान्वये स्थानबध्द करण्यात आले आहे. या गुन्हेगारांना नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आल्याचे सहायक आयुक्त समीर शेख यांनी सांगितले.

Web Title: 'Smart' action: Nashik police warn criminals to 'understand, improve'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.