कोरोनाबाधितांच्या तुलनेत अल्पशी वाढ आजपासून लाॅकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 01:33 AM2021-05-12T01:33:15+5:302021-05-12T01:41:32+5:30

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी मंगळवारी (दि.११) सोमवारच्या तुलनेत रूग्ण संख्येत अल्पशी वाढ झाली आहे. दरम्यान, कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्ह्यात बुधवार (दि. १२) पासून लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

A slight increase compared to the corona affected lockdown from today | कोरोनाबाधितांच्या तुलनेत अल्पशी वाढ आजपासून लाॅकडाऊन

कोरोनाबाधितांच्या तुलनेत अल्पशी वाढ आजपासून लाॅकडाऊन

Next

नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी मंगळवारी (दि.११) सोमवारच्या तुलनेत रूग्ण संख्येत अल्पशी वाढ झाली आहे. दरम्यान, कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्ह्यात बुधवार (दि. १२) पासून लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सोमवारी (दि.१०) १८३५ नवे बाधित होते, मात्र मंगळवारी २ हजार १८७ नवे बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील बाधितांच्या संख्येने कहर केला होता. मात्र एका उच्चांकी संख्येपर्यंत गेलेली बाधितांची संख्या मे महिन्यापासून कमी होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसात बाधितांची संख्या कमी अधिक होत असली तरी एकंदर बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. ८ मे रोजी २,७९५ बाधित आढळले होते. त्यानंतर रविवारी (दि.९) ३ हजार २ रूग्ण तर सोमवारी (दि.१०) १ हजार ८३५ इतकी कमी संख्या होती. शहरातील संख्या ९७३ इतकी कमी होती. गेल्या काही दिवसात चार आकडी संख्येपेक्षा नाशिक शहरातील बाधितांची संख्या कमी होत नव्हती. मात्र सोमवारी हजाराच्या खाली ही संख्या गेल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र मंगळवारी जिल्ह्याच्या आणि शहराच्या बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी २ हजार १८७ नवे बाधित आढळले आहेत. त्यात नाशिक शहरातील १ हजार ५८४ बाधितांचा समावेश आहे. बाधितांची संख्या गेल्या चार दिवसात कमी जास्त होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत  आहे. मंगळवारी तब्बल पाच हजाराहून अधिक बाधितांनी कोराेनावर मात केली. शनिवारी (दि.८) ४ हजार ६९, रविवारी (दि. ९) ३ हजार २५ बाधितांची संख्या गेल्या चार दिवसात कमी जास्त होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत  आहे. 

Web Title: A slight increase compared to the corona affected lockdown from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.