मजदूर संघ निवडणुकीत  २९ जागांसाठी साठ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 01:38 AM2021-04-05T01:38:11+5:302021-04-05T01:39:27+5:30

भारत प्रतिभूती व चलार्थ मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत  अध्यक्षपदी अखिल भारतीय हिंद मजदूर सभेचे खजिनदार जे. आर. भोसले यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित २९ जागांसाठी साठ उमेदवार रिंगणात आहेत.    

Sixty candidates for 29 seats in trade union elections | मजदूर संघ निवडणुकीत  २९ जागांसाठी साठ उमेदवार

मजदूर संघ निवडणुकीत  २९ जागांसाठी साठ उमेदवार

Next

नाशिकरोड :  भारत प्रतिभूती व चलार्थ मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत  अध्यक्षपदी अखिल भारतीय हिंद मजदूर सभेचे खजिनदार जे. आर. भोसले यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित २९ जागांसाठी साठ उमेदवार रिंगणात आहेत.    
मजदूर संघाच्या उपाध्यक्षपदाच्या चार जागांसाठी पन्नास अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ४१ जणांनी माघार घेतल्याने नऊ जण रिंगणात 
आहेत. कार्याध्यक्ष एक जागा- दोन उमेदवार, सरचिटणीस एक जागा- दोन उमेदवार, सहसचिव सहा जागा- बारा उमेदवार, खजिनदार एक जागा-दोन उमेदवार, कार्यकारिणी सदस्य सोळा जागा- २१ उमेदवार असे २९ जागांसाठी एकूण ६० उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी उत्तमराव गांगुर्डे यांनी दिली
दोन पॅनल ठाकली आमने-सामने
दहा एप्रिल रोजी मजदूर संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून आपला व कामगार पॅनलमध्ये समोरासमोर लढत आहे. दोन्ही पॅनलने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही मुद्रणालयात आपला व कामगार पॅनल कडून कामगारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचारावर जोर देण्यात आला आहे. निवडणुकीत विजयासाठी दोन्ही पॅनल कडून रणनीतीचा वापर केला जात आहे.. 

Web Title: Sixty candidates for 29 seats in trade union elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.