सहा जणांविरोधात संचारबंदी भंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 11:06 PM2020-04-06T23:06:06+5:302020-04-06T23:06:06+5:30

सिन्नर: कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना अंतर्गत सर्वत्र लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. तसेच संचारबंदी व जमावबंदी देखील लागू आहे. अशा परिस्थितीत विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणाºया सहा जणांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत संचारबंदी भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Six offenses against violation of communication ban | सहा जणांविरोधात संचारबंदी भंगाचा गुन्हा

सहा जणांविरोधात संचारबंदी भंगाचा गुन्हा

Next

सिन्नर: कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना अंतर्गत सर्वत्र लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. तसेच संचारबंदी व जमावबंदी देखील लागू आहे. अशा परिस्थितीत विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणाºया सहा जणांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत संचारबंदी भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
वावी गावात विनाकारण फिरणाºया व तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधता निष्काळजीपणा दाखवणाºयाच्या विरोधात कारवाईच्या बडगा उगारण्यात आला आहे. गावात विनाकारणच तरुण आणि ज्येष्ठ नागरिक देखील घराबाहेर फिरत असल्याची बाब अनेकदा निदर्शनास आली आहे. याबाबत वारंवार तोंडी सूचना करूनही लोक गांभीर्याने घेत नसल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने रविवारी सायंकाळी गावात रस्त्यावर फिरणाºया व सार्वजनिक ठिकाणी गप्पा झोडणाºयावर कारवाईचा बडगा उगारला. विनाकारण घराबाहेर फिरणाºया व दुचाकीवरून पोलिसांना चकवा देर्णा­यांविरोधात कारवाई करण्यात आली. गावातील तीन तरुणांसोबतच र्नि­हाळे येथील एक व त्याच्यासोबत पंचाळे येथील दोघांच्याविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निरहाले येथील तरुणाने त्याच्या ताब्यातील विना नंबर असलेली दुचाकी गावात फिरवली. सहाय्यक निरीक्षक गलांडे यांनी हटकले असता तिघांनीही मोटरसायकल सोडून धूम ठोकली. मात्र, पोलीस कर्मचारी व स्थानिक तरुणांनी त्यांना पकडले. हवालदार रामदास देसाई यांच्या फिर्यादीवरून वरील सर्वां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी चार दुचाकी देखील ताब्यात घेतल्या.

Web Title: Six offenses against violation of communication ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.