पुलावर धडक दिल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह शिवनदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 08:44 PM2020-09-10T20:44:02+5:302020-09-11T00:45:02+5:30

लासलगाव : लासलगाव-पिंपळगाव नजीकला जोडणाऱ्या पुलावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली पुलावरून नदीत कोसळली. सुदैवाने या वाहनावर चालक नसल्याने जीवितहानी टळली आहे. अपघात होताच बघ्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.

Sivanadi with tractor trolley after hitting the bridge | पुलावर धडक दिल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह शिवनदीत

पुलावर धडक दिल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह शिवनदीत

Next
ठळक मुद्देवाहनावर वाहन चालक नसल्याने जीवित हानी टळली

लासलगाव : लासलगाव-पिंपळगाव नजीकला जोडणाऱ्या पुलावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली पुलावरून नदीत कोसळली. सुदैवाने या वाहनावर चालक नसल्याने जीवितहानी टळली आहे. अपघात होताच बघ्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.
गुरूवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजेदरम्यान तळेगाव रोही येथील शेतकरी पुलावर ट्रॅक्टर व ट्रॉली उभे करून बाजारतळ येथे खरेदीसाठी गेलेले होते. ट्रॅक्टर गिअरमध्ये उभ्या अवस्थेत असताना अज्ञात वाहनाने या ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली पुलावरून खाली कोसळल्याने संपूर्ण ट्रॅक्टर व ट्रॉली नुकसानग्रस्त झाली. सुदैवाने या वाहनावर वाहन चालक नसल्याने जीवित हानी टळली आहे.

Web Title: Sivanadi with tractor trolley after hitting the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.