सिन्नरला सहा वाजेनंतर कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 09:42 PM2020-07-02T21:42:44+5:302020-07-02T22:59:24+5:30

सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सायंकाळी ६ वाजेनंतर कर्फ्यू राबविण्यात येणार आहे.

Sinner under curfew after six o'clock | सिन्नरला सहा वाजेनंतर कर्फ्यू

सिन्नर येथे बैठकीत बोलताना आमदार माणिकराव कोकाटे. समवेत प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, सीमंतिनी कोकाटे, लता गायकवाड, संजय केदार, पंडित लोंढे, बाळासाहेब वाघ.

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन : नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सायंकाळी ६ वाजेनंतर कर्फ्यू राबविण्यात येणार आहे.
व्यापारी व व्यावसायिकांनी नियमांची अंमलबजावणी करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले. नियम मोडणारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन कोकाटे यांनी माहिती दिली. 
सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहु पाटील, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड,  नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, स्टाइसचे चेअरमन पंडितराव लोंढे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 
सिन्नरकरांना आरोग्य आणि इतर सुविधांच्या बाबतीत गैरसोयींना सामोरे जावे लागणार नाही याबाबत आपण दक्ष आहोत. मात्र नागरिकांनी स्वत:च्या भवितव्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे जेणेकरून पुढील काळात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.शहरातील सर्व दुकाने बंद राहणार सिन्नर शहरात व तालुक्यात झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने व्यापारी संघटनेने शनिवारपर्यंत चार दिवस जनता कर्फ्यू राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून शहरातील सर्व दुकाने बंद असणार आहे. या बंदमधून दूध विक्रेते, औषध विर्क्रेते व दवाखाने यांना वगळण्यात आले आहे. या बंदची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मनोज भगत यांनी केले आहे.पार्किंग झोन उभारुन शहरात नाकाबंदीसिन्नर शहरात ये-जा करण्यासाठी तीन ते चार रस्ते खुले ठेवणार आहेत. वाहनचालकांनी पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करुन खरेदीसाठी यावे. विनाकारण गावात फिरणाºया वाहनचालकांवर पोलीस कडक कारवाई करणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. शहरात नाकाबंदी करुन कारवाई केली जाणार आहे.सिन्नर शहरात सकाळी ९ ते ५ या वेळेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्याच्या तसेच शहराबाहेर वाहनतळांचे नियोजन करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या असून, त्याची लागलीच अंमलबजावणी केली जाणार आहे. जनतेच्या हितासाठी कठोर निर्णय घेणे भाग पडत आहे.
- माणिकराव कोकाटे, आमदार

Web Title: Sinner under curfew after six o'clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.