Significant initiative of the newcomers | नवमतदारांचा लक्षणीय पुढाकार
नवमतदारांचा लक्षणीय पुढाकार

विधानसभेच्या मतदानासाठीमतदान केले तसेच माझ्या मित्र-मैत्रिनींनाही मतदान करण्यासाठी सांगितले. लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे.  - गौरी बैरागी, मतदान केंद्र,  मराठा हायस्कूल

मतदानाचा अनुभव खरोखरच चांगला होता. एक जबाबदार नागरिक असल्यासारखे वाटत आहे. म्हणूनच योग्यरीतीने उमेदवार निवडण्यासाठी व आपले कर्तव्य बजवावे.
- श्रुतिका देवरे, मतदान केंद्र- मनपा शाळा क्र . ७१, आनंदवली

महाराष्ट्रातील नागरिकांचे प्रश्न जो खरोखर सोडवू शकणाऱ्या उमेदवाराला मी मतदान करणे तसेच प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे.
- गौरव बडाख, नाशिक

लोकशाहीच्या मोठ्या महोत्सवात सहभागी होता आले याचा आनंद आहे. मी मतदान केलेल्या उमेदवाराने विधानभवनात सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करावे आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणे हीच अपेक्षा आहे.
- प्रसाद जाधव, नाशिक

लोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच आजच्या विधानसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी मी माझ्या संपूर्ण कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला.
- अशू औटे, नाशिक
काही भागांतील मूलभूत कामे झालेली नसतात. आता मी नवमतदार झाले असल्याने यात बदल घडवणार. त्यासाठी निवडणुकीनंतरही आमच्या भागात येणारा, लोकांना भेटून त्यांच्या समस्या सोडविणाºया उमेदवार मी मतदान केले.
- ऋतुजा कुंवर, नाशिक

आता मी सज्ञान झाल्यामुळे या राजकारणात बदल व्हायला पाहिजे असे वाटते, त्याची सुरुवात मी माझ्यापासून केली. मी मतदान केले आता मला या निवडणुकीनंतर चांगले वाईट बोलण्याचा अधिकार आला आहे.
- जान्हवी पाटील, पंचवटी

सर्व प्रथम राज्यातील आर्थिक बेरोजगारी कशी रोखता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे युवक हतबल होत चालले आहे. त्यामुळे आहे ते व्यवसाय निट चालावेत, नवनवीन छोटे-मोठे व्यवसाय राज्यात आले पाहिजे,
- प्रथमेश कुंवर, जुने नाशिक

मतदान केल्यानंतर समाधान वाटले. लोक शाही मजबूत करण्यासाठी आपल्यालाही योगदान देता आले याचा आनंद झाला. त्यामुळे यापुढील प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे.
- चेतना पगार, नाशिक

पहिल्यांदाच मतदान करत असून, यामुळे खूप आनंद झाला. लोकशाही प्रक्रियेत आपल्या मताला मूल्य आहे याची जाणीव यानिमित्ताने होते.
- कृष्णा पंजवाणी, अशोकामार्ग

Web Title:  Significant initiative of the newcomers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.