मुलभूत सुविधांसाठी अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 01:31 PM2019-09-16T13:31:14+5:302019-09-16T13:31:36+5:30

नांदगाव : तालुक्यातील जामदरी येथील असलेल्या एक हजार लोकसंख्येच्या तांड्यास पिण्याचे पाणी, शौचालय, वीज, रस्ते व गटारी, अंगणवाडी ईमारत स्मशानभूमी इत्यादी मुलभुत नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या नांदगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव पंचायत समितीचे अधिकारी एस.एल.खताळे यांना घेराव घालून निवेदन सादर करण्यात आले.

Siege officials for infrastructure | मुलभूत सुविधांसाठी अधिकाऱ्यांना घेराव

मुलभूत सुविधांसाठी अधिकाऱ्यांना घेराव

Next

नांदगाव : तालुक्यातील जामदरी येथील असलेल्या एक हजार लोकसंख्येच्या तांड्यास पिण्याचे पाणी, शौचालय, वीज, रस्ते व गटारी, अंगणवाडी ईमारत स्मशानभूमी इत्यादी मुलभुत नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या नांदगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव पंचायत समितीचे अधिकारी एस.एल.खताळे यांना घेराव घालून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी समितीचे नासिक जिल्हा नेते संजयगायकवाड, तालुका अध्यक्ष राजाभाऊ गांगुर्डे, तालुका सचिव गवळे, सहसचिव राजु मोरे, महीला तालुका अध्यक्ष नेहा कोळगे, मनमाड शहर अध्यक्ष सुरेखा ढाके, तालुका संघटक वसंत मोरे आदी उपस्थित होते. या वेळी गटविकास अधिकारी एस.एल.खताळे यांना घेराव घालुन सदर तांड्यातील नागरिकांसाठीच्या तांडा वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून सन. २०१५ ते २०१९ पर्यंत राबविण्यात आलेल्या योजनेची माहिती त्वरीत उपलब्ध करु न दिली नाही तर व तांड्याच्या वस्तीला निवेदनाप्रमाणे त्वरीत नागरी सुविधा उपलब्ध करु न देण्यात आली नाही. तर अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतीने उग्र स्वरु पाचे धरणे आंदोलन करु न मोर्चा काढला जाईल अशा आशयाचे प्रतिपादन रविंद्र जाधव यांनी दिले. या घेराव शिष्टमंडळात जामदरी तांड्याचे ग्रामपंचायत सदस्य काळु चव्हाण, मायकल राठोड, संघा चव्हाण, लखा पवार, सुदाम राठोड, कैलास ठाकरे, नवनाथ चव्हाण, रमेश जाधव, सुरेश देवरे, किरण पवार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Siege officials for infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक