श्रीकृष्ण जन्मोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदा भक्ता विना सुनासुना साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 09:41 PM2020-08-12T21:41:15+5:302020-08-13T00:09:42+5:30

चांदवड : येथील श्री गोवर्धन गिरीधारी गोपाल कृष्ण मंदिरात मंगळवार दि.११ आॅगस्ट रोजी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदाच्या वर्षी गावातील भक्ता विना सुनासुना साजरा करण्यात आला .

Shrikrushna Janmotsav is celebrated without devotees this year on the backdrop of Corona | श्रीकृष्ण जन्मोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदा भक्ता विना सुनासुना साजरा

श्रीकृष्ण जन्मोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदा भक्ता विना सुनासुना साजरा

Next
ठळक मुद्देश्रींच्या मूर्तीस महाभिषेक पूजन, आरती, प्रसाद आदि कार्यक्र म झाले.

चांदवड : येथील श्री गोवर्धन गिरीधारी गोपाल कृष्ण मंदिरात मंगळवार दि.११ आॅगस्ट रोजी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदाच्या वर्षी गावातील भक्ता विना सुनासुना साजरा करण्यात आला .दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव मध्यरात्री १२ वाजता मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. मंदिराच्या इतिहासात प्रथमच अशा साध्या घरघुती पध्दतीने उत्सव साजरा करण्यात आला. चांदवड शहरात वाढणारी कोरोना रु ग्णांची संख्या लक्षात घेता होळकर ट्रस्ट व प्रशासनाच्या सक्त आदेशानुसार यंदा फक्त मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी अमोल दीक्षीत व दीक्षीत कुटुंबीयांनी अत्यंत घरगुती स्वरूपात उत्सव साजरा केला उत्सव काळात श्रीकृष्णाच्या मुर्तीस दररोज राधा, देवर्षी नारद, पांडुरंग, श्रीनाथजी ,विठू महार, बालाजी अशा वेगवेगळ्या रु पात सजवण्यात आले गीता पाठ, विष्णुसहस्रनाम, श्रींच्या मूर्तीस महाभिषेक पूजन, आरती, प्रसाद आदि कार्यक्र म झाले.

मात्र भक्तांचा हिरमोड होऊ नये यासाठी सर्व कार्यक्र म सोशल मीडिया मार्फत भाविकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यावर्षी दीक्षीत कुटुंबीयांनी केला उत्सव काळात चांदवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होळकर ट्रस्टचे व्यवस्थापक एम.के.पवार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले कार्यक्र म यशस्वीतेसाठी पुजारी दीक्षीत परिवाराने परिश्रम घेतले.

Web Title: Shrikrushna Janmotsav is celebrated without devotees this year on the backdrop of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.