सिडको विभागीय कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:20 PM2020-03-31T22:20:29+5:302020-03-31T22:24:36+5:30

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात घरपट्टी, पाणीपट्टी अथवा इतर मूलभूत कामकाजासाठी नागरिकांची नियमित गर्दी असते. मार्च महिन्यात घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांची अधिक गर्दी असते, परंतु कोरोना व्हायरसचा पादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनीही स्वत: घराबाहेर न पडण्याचे ठरविल्याने मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे.

 Shocked at the CIDCO Departmental Office | सिडको विभागीय कार्यालयात शुकशुकाट

मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात शुकशुकाट

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचारीही सोशल डिस्टन्सचा वापर करीत असल्याचे दिसत आहे.

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात घरपट्टी, पाणीपट्टी अथवा इतर मूलभूत कामकाजासाठी नागरिकांची नियमित गर्दी असते. मार्च महिन्यात घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांची अधिक गर्दी असते, परंतु कोरोना व्हायरसचा पादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनीही स्वत: घराबाहेर न पडण्याचे ठरविल्याने मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे. विशेष म्हणजे कार्यालयातील घरपट्टी, पाणीपट्टी विभाग सुरू असताना नागरिक येत नसल्याने अधिकारी व कर्मचारीदेखील सोशल डिस्टनचा वापर करीत कार्यालयात असल्याचे दिसून आले.
दरवर्षी मार्च महिन्यात घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुली करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नागरिकांना तगादे लावले जात असे. यानंतर नागरिक कारवाईच्या भीतीने थकबाकी भरून टाकतात, परंतु सध्या मार्च महिना सुरू असतानाही कोरोना व्हायरसमुळे महापालिकेत मात्र कोणीही नागरिक फिरकत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. घरपट्टी, पाणीपट्टी अथवा इतर कोणत्याही विभागात नागरिक येत नसल्याने संपूर्ण मनपा कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे. सिडको, अंबड, पाथर्डी फाटा तसेच अश्विननगर, खुटवडनगर व परिसरातील नागरिक कोणत्या ना कोणत्या कामासाठी महापालिकेत नियमित येत असतात, परंतु राज्यासह देशात संचारबंदीचे आदेश लागू झाले असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले आहे. एकूणच गजबजलेल्या महापालिका कार्यालयात कर्मचारी, अधिकाऱ्यांना नागरिक दिसून येत नाही. यामुळे कर्मचारीही नागरिकांच्या प्रतीक्षेत असून, कर्मचारीही सोशल डिस्टन्सचा वापर करीत असल्याचे दिसत आहे.

Web Title:  Shocked at the CIDCO Departmental Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.