Shobhayatra on Mahavir Jayanti during Abhoya | अभोण्यात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा
अभोण्यात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

अभोणा : येथील सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक (जयंती ) महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जैन मंदिरापासुन भगवान महावीरांच्या प्रतिमेची सजविलेल्या रथावर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप जैन मंदिर प्रांगणात करण्यात येऊन तेथे सामुदायीक प्रतिमा पुजन करण्यात आले. प.पु. साध्वीजी सिद्धिगुणाश्रीजी व प.पु. साध्वीजी संयमगुणाश्रीजींच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने येथे भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रा काढण्यात आली. या प्रसंगी समाजप्रमुख सुमतीलाल शहा संघाचे अध्यक्ष रमेश शहा, नविनलाल शहा, दिलीप शहा, धर्मेंद्र शहा, संजय शहा, किरण शहा, योगेश शहा, भरत शहा, शिरीष शहा, मनोज शहा, राहुल शहा, किशोर शहा, लालु शहा, विनोद शहा, प्रदिप शहा, पद्मभुषण शहा, रमेशलाल शहा, संदिप शहा, विशाल शहा, अल्पेश शहा, राजु शहा, पोपट वखारीया, यांचेसह पाशर््व मंडळ व समाजबांधव, महिला मंडळ उपस्थित होते.


Web Title: Shobhayatra on Mahavir Jayanti during Abhoya
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.