दोडी विकास संस्था अध्यक्षपदी शिंदे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:01 PM2019-09-17T23:01:45+5:302019-09-18T00:26:29+5:30

सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कारभारी भगत शिंदे तर उपाध्यक्षपदी सारजाबाई दत्तू आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Shinde unopposed as president of Dodi Development Institute | दोडी विकास संस्था अध्यक्षपदी शिंदे बिनविरोध

दोडी विकास संस्था अध्यक्षपदी शिंदे बिनविरोध

Next

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कारभारी भगत शिंदे तर उपाध्यक्षपदी सारजाबाई दत्तू आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
रोटेशन पद्धतीने रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. रूद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. विहित वेळेत अध्यक्षपदासाठी कारभारी शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला व उपाध्यक्षपदासाठी सारजाबाई आव्हाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. दोन्ही पदांसाठी केवळ एक एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी रूद्राक्ष यांनी अध्यक्षपदी शिंदे तर उपाध्यक्षपदी आव्हाड यांची निवड घोषित केली. सोसायटीचे सचिव माधव जाधव यांनी सहायक म्हणून काम पाहिले. पांडुरंग केदार, के. पी. आव्हाड, आर.डी. आव्हाड, नीलेश केदार, माजी सरपंच नाथामामा आव्हाड यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी निवड जाहीर होताच ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संचालक सोमनाथ आव्हाड, बाळू सांगळे, दत्तू दराडे, रामनाथ उगले, सीताराम केदार, रामनाथ शिंदे, म्हाळू शेळके, बाळू भालेराव, रफिक मणियार, सखुबाई आव्हाड, राजेंद्र शिंदे, सोपान आव्हाड आदी उपस्थित होते.

Web Title: Shinde unopposed as president of Dodi Development Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.