सदगुरु पाणीवापर संस्थेच्या अध्यक्षपदी शांताराम सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 02:59 PM2020-10-11T14:59:12+5:302020-10-11T15:00:38+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शिवारातील चारी नंबर २९ वरील सदगुरु पाणी वापर संस्थेंच्या अध्यक्षपदी शांताराम सोनवणे, उपाध्यक्षपदी रमेश तांबे तर सचिव म्हणुन संतोष फापाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते संस्थेची सुत्रे सुपूर्द करण्यात आले.

Shantaram Sonawane as the President of Sadguru Panivapar Sanstha | सदगुरु पाणीवापर संस्थेच्या अध्यक्षपदी शांताराम सोनवणे

येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शिवारातील सद्गुरु पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षपदी शांताराम सोनवणे व उपाध्यक्षपदी रमेश तांबे यांच्या निवड प्रसंगी सत्कार करताना विठ्ठल जाधव, अर्जुन सोनवणे, भाऊसाहेब आव्हाटे.

Next
ठळक मुद्देनवनिर्वाचित अध्यक्ष शांताराम सोनवणे, उपाध्यक्ष रमेश तांबे यांचा सत्कार

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शिवारातील चारी नंबर २९ वरील सदगुरु पाणी वापर संस्थेंच्या अध्यक्षपदी शांताराम सोनवणे, उपाध्यक्षपदी रमेश तांबे तर सचिव म्हणुन संतोष फापाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते संस्थेची सुत्रे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष शांताराम सोनवणे, उपाध्यक्ष रमेश तांबे यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक विठोबा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अर्जुन सोनवणे, प्रभाकर खैरनार, उत्तम सोनवणे, सखाहरी वाळके, भाऊराव जाधव, मच्छिंद्र जाधव, पुंडलिक जाधव, किसन भड, गोटीराम सोनवणे, ज्ञानेश्वर दराडे, साहेबराव आव्हाटे, विठ्ठल सानप, भाऊसाहेब आव्हाटे, दिनकर दराडे, मधुकर बलसाने, सुखदेव मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Shantaram Sonawane as the President of Sadguru Panivapar Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.