फसवणूक प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 02:15 PM2019-12-06T14:15:16+5:302019-12-06T14:53:01+5:30

जागेचे खोटे दस्ताऐवज तयार करून फसवणूक करून प्लॉट विक्र ी केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात सात संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला

Seven offenses with two lawyers | फसवणूक प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

फसवणूक प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देखोटे दस्ताऐवज तयार करून फसवणूकसात संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : मखमलाबाद शिवारात असलेल्या जागेचे खोटे दस्ताऐवज तयार करून फसवणूक करून प्लॉट विक्र ी केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात सात संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ठाणे येथे राहणारे गुरूवायूर गुरु शंकर कृष्णन यांनी तक्र ार दाखल केली आहे.
      याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मखमलाबाद शिवारातील प्लॉट क्र मांक नंबर ७४ सर्व्हे क्र मांक ३७६/ २, ३७६/ २ बी मधील २८४ चौरस मीटर या प्लॉटचे मूळ मालक सुलभा रमेश चिटणीस २० वर्षांपूर्वी मयत झालेल्या असतांना हिरावाडी रोडवरील बळवंत आनंद अपार्टमेंट येथे राहणारे संशयित आरोपी बाळकृष्ण मुरलीधर दिघे यांनी खोटे मुखत्यारपत्र तयार कोणतीही खातरजमा न करता संशयित आरोपी दामोदर शंकर हेर्लेकर यांना प्लॉटची विक्र ी करून संशयित वानीश्री श्रीकृष्ण हेर्लेकर आणि चिरायू जनार्दन भट रा. भावनगर, गुजरात यांनी सदर प्लॉट सुधीर मोतीलाल राठोड यांना विकला. संशयित आरोपी त्यांनी कट रचून ठगबाजी करून मयत चिटणीस यांचे नावे असलेली त्यांच्या वारसदारांची मौल्यवान मिळकत गिळंकृत करण्याच्या उद्देशाने खोटे दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास म्हसरूळ पोलिस करीत आहे.

Web Title: Seven offenses with two lawyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.