ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव भणगे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:14 AM2019-08-15T01:14:20+5:302019-08-15T01:14:39+5:30

जिल्हा सरकारी व परिषद बँकेचे माजी अध्यक्ष, राज्य कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी तसेच सेवानिवृत्त विक्र ीकर अधिकारी माधवराव पांडुरंग भणगे (८१) यांचे हृदयविकाराने निधन झाले.

 Senior social worker Madhavrao Bhaane passed away | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव भणगे यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव भणगे यांचे निधन

Next

नाशिक : जिल्हा सरकारी व परिषद बँकेचे माजी अध्यक्ष, राज्य कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी तसेच सेवानिवृत्त विक्र ीकर अधिकारी माधवराव पांडुरंग भणगे (८१) यांचे हृदयविकाराने निधन झाले.
दिंडोरीरोड येथील लामखडे मळा येथे त्यांचे वास्तव्य होते. विक्र ीकर विभागात कार्यरत असतानाच ते विविध कर्मचारी संघटनांशी जोडले गेले. जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषविले होते. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेचे उपाध्यक्ष, पंचवटी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, सरकारी व जिल्हा परिषद निवृत्त सेवक संघटनेचे ते अध्यक्ष होते.
श्री समर्थ सहकारी बँकेचे व्यवस्थापक सुनील भणगे तसेच व्यावसायिक सुहास भणगे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी (दि.१४) रात्री नऊ वाजता त्यांच्यावर पंचवटी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Web Title:  Senior social worker Madhavrao Bhaane passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.