ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 04:15 PM2020-03-21T16:15:50+5:302020-03-21T16:18:41+5:30

नाशिक : नाशिकसह राज्यातील साहित्य विश्वात काव्याद्वारे ठसा उमटवलेले कुसुमाग्रजांचे मानसपुत्र ज्येष्ठ कवी आणि सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष किशोर पाठक (६८) यांचे शनिवारी (दि.२१) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.

Senior poet Kishore Pathak passes away | ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांचे निधन

ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देकविता दिनी नाशिकचे काव्य हरपलेसाहित्य वर्तुळावर शोककळा

नाशिक :नाशिकसह राज्यातील साहित्य विश्वात काव्याद्वारे ठसा उमटवलेले कुसुमाग्रजांचे मानसपुत्र ज्येष्ठ कवी आणि सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष किशोर पाठक (६८) यांचे शनिवारी (दि.२१) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. पाठक हे काही काळापासून आजारी होते. मात्र, तरीदेखील ते आजाराशी संघर्ष करीत नाशिकमधील सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान देत होते. विशेष म्हणजे शनिवारी कविता दिन असतानाच नाशिकमधील काव्य हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पाठक यांचे सुमारे २८ कवितासंग्रह प्रसिद्ध झाले होते. त्यांना राज्य शासनासह राज्यातील विविध संस्थांचे पुरस्कारदेखील प्राप्त झालेले होते. त्यात ‘पालव’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रचंड गाजला होता. त्यांनी लिहिलेल्या स्त्रीविषयक कवितादेखील विशेष गाजल्या. त्यातील ‘बेचकीत जन्मतो जीव’ या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार लाभले होते. तसेच बालकवितांचेही त्यांनी विपुल लेखन केले. नाशिकला झालेल्या ७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्यवाह म्हणून त्यांनी अत्यंत कुशलतेने धुरा सांभाळली होती.

पाठक हे काही दिवसांपासून आजारी होते. मात्र, तरीदेखील ते आजाराशी संघर्ष करीत नाशिकमधील सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान देत होते. नाशकात सार्वजनिक वाचनालयाने भरवलेल्या पहिल्या बाल साहित्यिक मेळाव्याच्या आयोजनातही त्यांनी विशेष योगदान दिले होते. इंदिरानगरचे रहिवासी असलेल्या पाठक यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे, असा परिवार आहे.

Web Title: Senior poet Kishore Pathak passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.