दोन उपकरणांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:16 PM2020-01-22T22:16:45+5:302020-01-23T00:14:54+5:30

ठाणगाव येथील विद्यालयाचा विद्यार्थी वैभव साहेबराव सांगळे याने बनवलेली मल्टियुज बाइक फॉर फार्मर्स आणि वैभव ज्ञानेश्वर पानसरे याने तयार केलेले मॉडर्न पेस्टिमाइड स्प्रइंग मशीन ही दोन्ही उपकरणे राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी पात्र ठरली आहेत.

Selection of two devices for state level display | दोन उपकरणांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड

ठाणगाव येथील विद्यार्थी वैभव पानसरे व वैभव सांगळे यांना नाशिक येथील इन्स्पायर अवॉर्ड योजना विज्ञान प्रदर्शनात गौरविण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देठाणगाव विद्यालयाची भरारी : इन्स्पायर अवॉर्डसाठी पात्र

ठाणगाव : येथील विद्यालयाचा विद्यार्थी वैभव साहेबराव सांगळे याने बनवलेली मल्टियुज बाइक फॉर फार्मर्स आणि वैभव ज्ञानेश्वर पानसरे याने तयार केलेले मॉडर्न पेस्टिमाइड स्प्रइंग मशीन ही दोन्ही उपकरणे राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी पात्र ठरली आहेत.
नाशिक येथील संदीप फाउण्डेशमध्ये आयोजित जिल्हास्तरीय प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या उपयोगी ठरणाºया या दोन्ही उपकरणांनी बाजी मारली. भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्र ीडा विभाग मुंबई, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान व गणित शिक्षणसंस्था) नागपूर, शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक व संदीप फाउण्डेशन यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
ठाणगाव येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वैभव साहेबराव सांगळे याच्या मल्टियुज बाईक फॉर फार्मर्स तसेच वैभव ज्ञानेश्वर पानसरे याच्या मॉडर्न पेस्टिसाइड स्प्रेइंग मशीन या दोन उपकरणांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. प्रदर्शनात एकूण ५६० प्रतिकृतींची मांडणी करण्यात आली होती. पाच उपकरणांची निवड या प्रदर्शनासाठी झाली होती. या विद्यार्थ्यांना वाय. एम. रुपवते, व्ही. एस. वाघचौरे, एच. डी. कापडणीस, आय बी टी निदेशक अझर मनियार, करिश्मा वाघ, एस. डी. सरवार, आर. एम. मेंगाळ, के. बी. भारमल, एस. व्ही. बेद्रे आदींचे मार्गदर्शन लाभले.
छोट्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा या दोन्ही चल उपकरणांद्वारे कमी खर्चात तसेच कमी वेळेत शेतीची नांगरणी, वखरणी, पेरणी आदी मशागतीच्या कामांबरोबरच कीटकनाशक फवारणी ही सर्व कामे करणारी यंत्रणा वैभव सांगळे व वैभव पानसरे या दोन विद्यार्थ्यांनी विकसित केली आहे.

Web Title: Selection of two devices for state level display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.