Selection of Sujata Bhagat as the Director of the Library | सुजाता भगत यांची वाचनालयाच्या संचालकपदी निवड

सुजाता भगत

ठळक मुद्देनगर परिषदेच्या वतीने सार्वजनिक वाचनालयावर एक प्रतिनिधी संचालक असतो.

सिन्नर: नगरपरिषदेच्या प्रतिनिधी म्हणून नगरसेविक सौ.सुजाता अमोल भगत यांची सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. तसे पत्र अध्यक्ष कृष्णाजी भगत, कार्यवाह हेमंत वाजे यांनी भगत यांना दिले आहे.
नगर परिषदेच्या वतीने सार्वजनिक वाचनालयावर एक प्रतिनिधी संचालक असतो. त्या नुसार माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थक सुजाता भगत यांना ही संधी मिळाली आहे. 1945 पासून सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीचा मानबिंदू म्हणून कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थेमध्ये भगत यांना वाचनालयाच्या कार्यकारिणीबरोबर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. 


 

Web Title: Selection of Sujata Bhagat as the Director of the Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.