‘कश्यपी’ची सुरक्षितता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:51 PM2020-01-11T23:51:06+5:302020-01-12T01:26:49+5:30

नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरण परिसर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, अतिउत्साही व मद्यपीच्या टोळ्यांच्या वावरामुळे परिसरात अनेक दुर्घटना कायम घडू लागल्या आहेत. धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लावण्यात आलेले तसेच धरणाच्या पाणी क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करणारे मार्गदर्शक फलकाची टवाळखोरांनी नासधूस केली आहे.

Security of 'Kashyapi' threatened | ‘कश्यपी’ची सुरक्षितता धोक्यात

‘कश्यपी’ची सुरक्षितता धोक्यात

Next
ठळक मुद्देटवाळखोरांचा उपद्रव । मार्गदर्शक फलकाची नासधूस; कारवाईची मागणी

गंगापूर : नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरण परिसर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, अतिउत्साही व मद्यपीच्या टोळ्यांच्या वावरामुळे परिसरात अनेक दुर्घटना कायम घडू लागल्या आहेत. धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लावण्यात आलेले तसेच धरणाच्या पाणी क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करणारे मार्गदर्शक फलकाची टवाळखोरांनी नासधूस केली आहे. टवाळखोरांच्या या वाढत्या उपद्रवाकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असून, त्यामुळे नसल्याने परिसरातील हॉटेलचालकांनी धरणाच्या परिसरात शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक तालुक्यातील पश्चिम भागात बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणावर कायमच शहरी पर्यटकांची गर्दी असते. डोंगरी भागात निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या कश्यपी धरणाच्या परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. मांसाहार व ताजे मासे व हौशी पर्यटकांसाठी मिळतात, त्यामुळे निवांत रम्य परिसर म्हणून मौजेसाठी अनेकजण याठिकाणी येतात. मात्र या भागात उत्साही व टवाळखोरांचा मुक्तवावर असल्याने हा परिसर अतिशय धोकेदायक व संवेदनशील बनला आहे. धरणांचा परिसर कचरामुक्त असायला हवा, मात्र पर्यटकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर व दारूच्या बाटल्यांचा खच कायम आढळतो. सध्या धरणाला भरपूर पाणी असून, अनेक अतिउत्साही तरुण पाण्याचा अंदाज न बांधता उड्या घेतात त्यातून दुर्घटना घडल्या आहेत. तर महिला, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही या ठिकाणी घडू लागल्याने या भागात आता एकटे दुकटे फिरणे धोकेदायक बनले आहेत.
पर्यटकांच्या जिवाची काळजी व धरणाची सुरक्षितता लक्षात घेता, धरण परिसरात धोकेदायक ठिकाणी प्रतिबंध करणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र टवाळखोरांकडून या फलकांची मोडतोड करण्यात आली आहे.
या भागातील पर्यटकांची वाढती संख्या व सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांची कायमस्वरूपी गस्त असावी, अशी मागणी धोंडेगाव व कश्यपीनगरच्या नागरिकांनी केली आहे.

दुर्घटनेची शक्यता
धरणांचा परिसर कचरामुक्त असायला हवा, मात्र पर्यटकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर व दारूच्या बाटल्यांचा खच कायम आढळतो. सध्या धरणाला भरपूर पाणी असून, अनेक अतिउत्साही तरुण पाण्याचा अंदाज न बांधता उड्या घेतात त्यातून दुर्घटना घडल्या आहेत. तर महिला, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही या ठिकाणी घडू लागल्याने या भागात आता एकटे दुकटे फिरणे धोकेदायक बनले आहेत.

कश्यपी धरणावर येणाºया पर्यटकांचा प्रकल्पग्रस्तांना काही फायदा नाही. धरणासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. अशात या भागात वाढते पर्यटन व टवाळखोरांचा नेहमीच्या उच्छादामुळे धरणांचे फलकही असुरक्षित आहेत. त्यामुळे या भागात कायम पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. यासंदर्भात आम्ही प्रशासनाला पत्रही दिले आहे.
- सोमनाथ बेंडकोळी, धोंडेगाव

Web Title: Security of 'Kashyapi' threatened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण