द्राक्षे पंढरीतील बळीराजा व्यापाऱ्यांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 06:26 PM2021-03-13T18:26:54+5:302021-03-13T18:27:29+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला संपूर्ण जिल्ह्यात धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जवळ जवळ ८० टक्के शेतकरी वर्गाने द्राक्षे ...

In search of Baliraja merchants in Grape Pandhari | द्राक्षे पंढरीतील बळीराजा व्यापाऱ्यांच्या शोधात

द्राक्षे पंढरीतील बळीराजा व्यापाऱ्यांच्या शोधात

Next
ठळक मुद्देलखमापूर : लॉकडाउनची शेतकरी वर्गाने घेतली मोठी धास्ती

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला संपूर्ण जिल्ह्यात धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जवळ जवळ ८० टक्के शेतकरी वर्गाने द्राक्षे पिकांला पसंती दिली आहे. तसेच शेतीसी निगडीत व्यवसाय करीत आहे. परंतु सध्याच्या मितीला दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्ग अतिशय खडतर मार्गातुन द्राक्षे पिके वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करीत आहे.

दिंडोरी तालुक्यात द्राक्षे व उस हे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.त्यात नगदी पैसा मिळुन देणारे पिक द्राक्षे वर्षभर मेहनत करून घेतले जाते. तेव्हा उत्पन्नांचे पैसे हातात पडतात. भरपूर भांडवल, अतिशय महागडे औषधे, मोठ्या प्रमाणात खर्च, हे सर्व समीकरण जुळून द्राक्षे पिक घेतले जाते. परंतु तयार झालेले द्राक्षे जेव्हा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्याची वेळ येते. तेव्हा मात्र द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गाला मोठी कसरत करावी लागते.
                     शेतकरी वर्गाची खरी लुटमार सुरु होते, ती द्राक्षे तयार झाल्यानंतर व्यापारी शोधण्यापासुन त्यात चांगला व्यापारी मिळणे, त्याने फसवणूक न करता चांगला भाव मिळून देणे हे महत्वाचे ठरत आहे. आता तर द्राक्षे पिके तयार झाल्यानंतर दलालीमुळे आपल्या द्राक्षे पिकांला चांगला भाव मिळावा म्हणून दलालांच्या विनवण्या कराव्या लागतात. त्याकरिता टक्केवारीची भाषा बोलण्यात येऊन नविन अमिष दाखविण्यात येते. दुसरीकडे परप्रान्तीय व्यापारी दलालांना जास्त कमीशनचे अमिष दाखवून शेतकरी वर्गाकडून द्राक्षे माल विकत घेतात. प्रत्यक्ष माल काढण्याच्या वेळी चांगला भाव देण्याचा व सूरुवातीला चांगला द्राक्षे माल काढून घ्यायचा नंतर मात्र माल लवकर खराब होतो व आहे, भाव नाही,मालाला उठाव नाही, बाजारपेठेत माल विकला जात नाही अशी वेगवेगळे बहाणे करून अर्धवट बाग काढणी बंद करणे. हा अर्धवट शिल्लक राहिलेला माल दुसरा कोणी व्यापारी घेत नाही. मग मिळले त्या कवडीमोल भावाने पैसा पदरात पाडून घेण्याकरीता शेतकरी माल देण्यासाठी तयार होतो.

निर्यातीसाठी द्राक्षे उत्पादनांसाठी उत्पादकांना कमीत कमी ३० ते ४० रुपये प्रति किलो सरासरी खर्च पडतो.तसेच अनेक अस्मानी व सुलतानी संकटे, वातावरणातील बदलाव, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, अशा शंभर संकटातून बागा वाचून द्राक्ष निर्यातीसाठी तयार होतात. आणि तेव्हा शेतकऱ्यांना मोठा ज्या निर्यातदार संस्थेशी किंवा कंपनीशी द्राक्षविक्रीचा व्यवहार केलेला असेल, त्या कंपनीचा कर्मचारी स्वतः बागेत येऊन माल योग्य तयार झाला की नाही यांची खात्री करून घेतात.
              द्राक्षांमध्ये कोणताही विषारी रासायनिक अंश शिल्लक नाही. याची खात्री करून घेतात.तसेच यासाठी द्राक्षांची नमुने तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठविले जातात.त्यासाठी खर्चाचे वेगवेगळ्या स्वरूपाची रक्कम आकारली जाते. हा खर्च देखील शेतकरी वर्गाच्या माथी टाकला जातो.

प्रत्यक्षात दोन-दोन महिने उलटून गेले तरी पैसे मिळत नाही. बँकेचे चेक दिले तर अपुरी रक्कमेमुळे बाऊन्स होतात. असे अनेक संकटे द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला भोगावे लागत आहे. त्यामुळे सध्या द्राक्षे उत्पादक बळीराजा ला चांगल्या व प्रामाणिक व्यापारी वर्गाची प्रतिक्षा लागली आहे.
(१३ ग्रेप्स १)

Web Title: In search of Baliraja merchants in Grape Pandhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.