धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षणासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 07:13 PM2020-08-09T19:13:01+5:302020-08-10T00:27:27+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक धरणे असतांना स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. ज्या शेतकºयांनी धरणासाठी आपल्या स्वत:च्या जमीनी दिल्या त्याच शेतकºयांवर आज पाण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षण करण्यात यावे या मागणीचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ यांना माणिकखांब येथील शेतकºयांच्यावतीने रविवारी सादर करण्यात आले.

Sakade for reserving water for agriculture from the dam | धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षणासाठी साकडे

इगतपुरी तालुक्यातील दारणा व वाकी खापरी धरणातून कायमस्वरूपी शेतीसाठी पाण्याचे आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ यांना देतांना हरिश्चंद्र चव्हाण, हनुमान मराडे आदीसह स्थानीक शेतकरी.

Next
ठळक मुद्देइगतपुरी : शेतकऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक धरणे असतांना स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. ज्या शेतकºयांनी धरणासाठी आपल्या स्वत:च्या जमीनी दिल्या त्याच शेतकºयांवर आज पाण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षण करण्यात यावे या मागणीचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ यांना माणिकखांब येथील शेतकºयांच्यावतीने रविवारी सादर करण्यात आले.
जलसंपदा विभागाकडे कित्येकदा पाठपुरावा करून सुद्धा शेतीला पाणी मिळत नाही. इगतपुरी तालुक्यातील वाकी - खापरी धरण बांधून बरेच वर्षे लोटून सुद्धा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजून सुटलेल्या दिसत नाहीत. या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वाकी, बिटूर्ली, आडवन, खंबाळे, धरणोली, कुर्नोली, खंबाळेवाडी या गावांसह आणखी कित्येक गावांना धरणांच्या पाण्याचा एक थेंबदेखील शेतकºयांना मिळालेला नाही. वाकी - खापरी धरणातून शेतीसाठी पाणी मिळावे आदी मागण्या माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण व वकील संघाचे हनुमान मराडे यांच्यासह स्थानिक शेतकºयांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केल्या.
याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके, संदीप गुळवे, तालिम संघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, हरिश्चंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, अँड. हनुमान मराडे उपस्थित होते.

Web Title: Sakade for reserving water for agriculture from the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.