सिन्नरच्या ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयांस सुरक्षा उपकरणे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 07:36 PM2020-10-27T19:36:39+5:302020-10-28T01:17:43+5:30

सिन्नर: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिन्नरच्या ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब विचारात घेऊन डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दापुर येथील तरुण एकत्र येत सामाजिक उपक्रमातुन सिन्नर ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयास पीपीई किट, फेसशिल्ड, मास्क,हॅण्डग्लोव्हज , आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

Safety equipment visit to rural sub-district hospitals in Sinnar | सिन्नरच्या ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयांस सुरक्षा उपकरणे भेट

सिन्नरच्या ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयांस सुरक्षा उपकरणे भेट

Next
ठळक मुद्देदापुर येथील तरुण एकत्र येत सामाजिक उपक्रम.

सिन्नर: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिन्नरच्या ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब विचारात घेऊन डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दापुर येथील तरुण एकत्र येत सामाजिक उपक्रमातुन सिन्नर ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयास पीपीई किट, फेसशिल्ड, मास्क,हॅण्डग्लोव्हज आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
दापुरकर रोडलाईन्स गोरेगाव मुंबई येथील संदीप आव्हाड,राजु आव्हाड(गारे),दापुर ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, गोरेगाव फिल्म सिटी मित्र मंडळाचे उमेश मंडल, पांडुरंग आव्हाड, नवनाथ आव्हाड, समाधान आव्हाड, या तरुणांनी एकत्र येत कोरोना योद्ध्यांना सुरक्षा साधने रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ.निर्मला पवार, डॉ.संजय वलवे, आरोग्य सहाय्यक अशोक सुर्यवंशी, डॉ.योगिता ठाकरे, डॉ.गिरीष भालेराव, कविता लांडगे (फार्मासिस्ट),अश्पाक शेख यांच्या कडे देण्यात आल्या.

Web Title: Safety equipment visit to rural sub-district hospitals in Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.