ग्रामीण पोलिसांचा महिलांसाठी ‘भरोसा सेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 08:43 PM2020-03-07T20:43:25+5:302020-03-07T20:44:22+5:30

भरोसा सेलअंतर्गत महिलांना मानसिक आधारासोबतच आवश्यकतेनुसार वैद्यकिय उपचार व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी समुपदेशन करण्याचे कामही करण्यात येत आहे.

Rural police 'trust cell' for women | ग्रामीण पोलिसांचा महिलांसाठी ‘भरोसा सेल’

ग्रामीण पोलिसांचा महिलांसाठी ‘भरोसा सेल’

Next
ठळक मुद्देभुजबळ यांच्या हस्ते प्रारंभ : स्वयंसिद्धा पुरस्काराचे वितरणपोलिस वाहनावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरा व बॉडी वार्न कॅमेऱ्यांचे उद्घाटन

लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : पोलीस यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलच्या माध्यमातून पीडित महिलांना विश्वास व मानसिक आधार देण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.


जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस विभाग यांच्याकडून मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे आयोजित स्वयंसिद्धा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, भरोसा सेलअंतर्गत महिलांना मानसिक आधारासोबतच आवश्यकतेनुसार वैद्यकिय उपचार व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी समुपदेशन करण्याचे कामही करण्यात येत आहे. त्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी भरोसा अत्यंत उपयोगी आहे. महिलांवरील अत्याचार कमी करून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घाण्यासाठी महाराष्ट्रात देखील दिशासारखा कडक कायदा लागू होईल असेही भुजबळ यांनी सांगितले. यावेळी बोलताना खासदार भारती पवार म्हणाल्या, स्त्रीच्या कर्तृत्वाला गौरवशाली इतिहास आहे. इतिहासाच्या प्रेरणेतूनच महिलांनी घराच्या जबाबदारीसह अंतराळापर्यंत झेप घेवून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. यातूनच स्त्रीयांनी प्रेरणा घेवून आयुष्यात सक्षमपणे उभे राहणे आवश्यक आहे. चूल आणि मूल ही जबाबदारी सांभाळून महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. महिला शक्तीचा सन्मान महिला दिनापुरता मयार्दीत न ठेवता तो कायम स्वरूपी करणे आवश्यक असल्याचे डॉ. आरती सिंह यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. यावेळी नाशिक ग्रामीण पोलिस कार्यालयात भरोसा सेलचे उद्घाटन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच भुजबळ नॉलेजसिटी येथे नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा पुरस्कार वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महिलांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. यावेळी ‘भरोसा&#३९’ या पुस्तकाचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात त्याच बरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या पोलिस वाहनावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरा व बॉडी वार्न कॅमेऱ्यांचे देखील यावेळी उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Rural police 'trust cell' for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.