प्रशासनाची धावपळ : लोकप्रतिनिधींचा मार्ग मोकळा आचारसंहिता संपल्याने कामांची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 01:45 AM2019-11-01T01:45:41+5:302019-11-01T01:45:58+5:30

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून लागू असलेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अखेर संपुष्टात आली असून, आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे पाच महिने शिल्लक असल्याने आता शासकीय पातळीवर कामांची घाई सुरू झाली आहे.

Running of Administration: Delegation of Public Representatives | प्रशासनाची धावपळ : लोकप्रतिनिधींचा मार्ग मोकळा आचारसंहिता संपल्याने कामांची घाई

प्रशासनाची धावपळ : लोकप्रतिनिधींचा मार्ग मोकळा आचारसंहिता संपल्याने कामांची घाई

Next

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून लागू असलेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अखेर संपुष्टात आली असून, आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे पाच महिने शिल्लक असल्याने आता शासकीय पातळीवर कामांची घाई सुरू झाली आहे. आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली कामे, रखडलेल्या शासकीय योजनांच्या फाईलींवरील धूळ झटकण्यात येऊन कामे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचीही धावपळ उडणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असले तरी, त्यासाठी २१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली होती. त्यामुळे आचारसंहिता जारी झाल्यापासून महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, आदिवासी आयुक्त कार्यालय ते सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमधील कामकाजावर परिणाम झाला होता. कोणत्याही नवीन कामांना मंजुरी बंद करण्यात आली, त्याचबरोबर व्यक्तिगत व सार्वजनिक लाभाच्या योजनांनाही थंड बस्त्यात बांधून ठेवण्यात आले. मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही कृत्य वर्ज्य करण्यात आल्यामुळे कामे ठप्प झाली होती. चालू वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास तीन महिने निवडणूक आचारसंहिता जारी असल्यामुळे जिल्ह्यातील विकासकामे रखडली होती. लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात येताच

Web Title: Running of Administration: Delegation of Public Representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.