घरफोडीत २४ हजारांचा ऐवज चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:17 AM2020-09-20T01:17:48+5:302020-09-20T01:18:45+5:30

आर्टिलरी सेंटर रोडवरील सुवर्ण सोसायटी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने २४ हजारांचा ऐवज चोरून नेला.

Rs 24,000 stolen in burglary | घरफोडीत २४ हजारांचा ऐवज चोरीस

घरफोडीत २४ हजारांचा ऐवज चोरीस

Next

नाशिकरोड : आर्टिलरी सेंटर रोडवरील सुवर्ण सोसायटी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने २४ हजारांचा ऐवज चोरून नेला.
वत्सला जनार्दन आहेर यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गेल्या १८ आॅगस्ट रोजी घराला कुलूप लावून मुंबईतील जे. जे. रुग्णालयात मुलीला भेटायला गेले होते. ५ सप्टेंबर दुपारी चारला मुलगा घरी चक्कर मारण्यास गेला असता दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला व घरातील साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसले. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून पाच तोळे वजनाची चांदीची सरस्वती, पाच तोळे वजनाचा चांदीचा गणपती, सात तोळ्याचे चांदीचे शिक्के, सोन्याची कर्णफुले, अंगठी असा २४ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
शतपावलीला जाणे पडले महागात; सोनसाखळी लंपास
नाशिक : पतीसमवेत शतपावलीसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना काठेगल्ली ते द्वारकादरम्यान घडली.
याप्रकरणी कल्पना संजय सेठी (रा. अंबिकानगर, पखालरोड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुणे महामार्गावर रात्रीच्या सुमारास त्या पतीसमवेत शतपावली करत असताना द्वारकेच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून नेली.

Web Title: Rs 24,000 stolen in burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.