तिसगाव शिवारात पेट्रोलपंपावर लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 02:30 PM2020-07-15T14:30:27+5:302020-07-15T14:30:52+5:30

वणी : वणी-पिंपळगाव रस्त्यावरील तिसगाव फाट्यावरील पेट्रोलपंपावर चार अज्ञातांनी कोयत्याचा धाक दाखवुन लुट केल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

Robbery at a petrol pump in Tisgaon Shivara | तिसगाव शिवारात पेट्रोलपंपावर लूट

तिसगाव शिवारात पेट्रोलपंपावर लूट

Next

वणी : वणी-पिंपळगाव रस्त्यावरील तिसगाव फाट्यावरील पेट्रोलपंपावर चार अज्ञातांनी कोयत्याचा धाक दाखवुन लुट केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास तिसगाव शिवारातील साई गजानन पेट्रोलपंपलगतच्या कॅबीनजवळ दोन मोटरसायकलवर चार अज्ञात संशयित आले. त्यांनी केबिनची काच फोडत आत प्रवेश केला. तेथे पेट्रोलपंपावरील कर्मचारी झोपलेले होते. मात्र काच फोडण्याचा आवाज आल्याने ते जागे झाले. त्या अज्ञात चौघांनी पेट्रोलपंपावरील दोन कर्मचाऱ्यांकडे पैशाची मागणी केली. शिवाय कर्मचाऱ्यांना मारहाण करत कोयत्याचा धाक दाखविला व जीवे मारण्याची धमकी दिली. जीव वाचविण्याच्या भितीने या दोन कर्मचाºयांनी सोळा हजार पाचशे रु पये असलेली छोटी बॅग संशयितांच्या हवाली केली. पैेस हातात येताच लुटारु ंनी घटनास्थळावरु न पळ काढला. कर्मचार्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पेट्रोलपंप मालकाला दिली. सदर घटना तत्काळ पोलिसांना कळविण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व पेट्रोलपंप परिसराची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर शिंपी स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
----------------------
सीसीटीव्हीत घटना कैद
पोलिसांनी सिसिटिव्ही फुटेजची पाहणी केली असता लूटीचा प्रकार कैद झाला आहे. मात्र रात्रीची वेळ व लाईट बंद असल्याने अंधुक प्रकाशात संशयितांची ओळख पटविता आली नाही. तोंड कपड्याने झाकलेले असल्यामुळे केवळ शरीयष्टी देहबोली व लुटमारीची पद्धत यावरु न तपास सुरु आहे. या पेट्रोलपंपावर जबरी लुट केल्याप्रकरणी २५ ते ३० वयोगट असणार्या संशयीतांनी ही लुट केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. देवीदास संपत चतुर या कर्मचार्याने याबाबत फिर्याद दिल्याने चौघा संशयितांविरोधात शस्त्राचा धाक दाखवुन जबरी लुट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे करत आहे.

Web Title: Robbery at a petrol pump in Tisgaon Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक