Roads in the streets or vehicles; Just be careful! | रस्त्यांलगत अथवा वाहनतळात वाहने उभी करताहेत; जरा सावधान!
रस्त्यांलगत अथवा वाहनतळात वाहने उभी करताहेत; जरा सावधान!

ठळक मुद्देवाहनतळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत आणणे गरजेचे

नाशिक : शहर व परिसरात मोटारींच्या काचा फोडून मोटारींमधील मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा लंपास करणारी टोळी अद्याप सक्रीय असून या घटना थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी (दि.२६) गोदाकाठावर भाविकांच्या मोटारीची वाहनतळात काच फोडून चोरट्यांनी दीड ते दोन लाखांचा ऐवज लूटला. आदिवासी विकास भवनच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या मोटारीची काच त्याचदिवशी फोडून चोरट्यांनी वाहनातून टॅब लांबविला. शहर पोलीस प्रशासनापुढे घरफोड्या, मोटारफोडी, वाहनचोरी, मोबाइल, सोनासाखळी लूटीच्या घटना रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
रामकुंड परिसरात महापालिकेचे वाहनतळ असून या वाहनतळावर परराज्यांमधून येणारे भाविक वाहनतळ शुल्क भरून वाहने उभी करतात. जेणेकरून अधिकृत वाहनतळ असल्यामुळे आपली वाहने सुरक्षित राहतील; मात्र या वाहनतळांमधील वाहनेही सुरक्षित राहत नसून चोरटे या ठिाकणीही उभ्या असलेल्या मोटारींच्या काचा सर्रासपणे फोडून भाविकांचे मौल्यवान वस्तू, दागिणे, रोकड लूटून पोबारा करत असल्याचे समोर आले आहे. संबंधित ठेकेदाराने वाहनतळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत आणणे गरजेचे आहे; मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने एकप्रकारे भाविकांची फसवणूक होत असल्याचे बोलले जात आहे. याकडे महापालिका व पोलस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
हरियाणातील गुडगाव येथून हेमंत ठाकूर हे कुटुंबीयांसमवेत पंचवटीमध्येदेवदर्शनासाठी आले होते. बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या ताब्यातील चारचाकी (एम एच०६ बी.एफ ८५६५) रामकुंड येथील मनपा वाहनतळावर उभी केली.परिसरात ते देवदर्शनासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीची काच फोडून डेल कंपनीचा तीस हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर ठाकूर यांनी संबंधित वाहनतळ चालविणा-या व्यक्तींना धारेवर धरत जाब विचारला. वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी यावेळी त्याने झटकली. दुस-या घटनेत विशाल बाळासाहेब ढिकले (29, रा. धनराज नगर, जुना सायखेडा रोड) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. विशाल यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने बुधवारी दुपारच्या सुमारास मोटारीची (एम.एच१५ जीएल५६९९) काच फोडून १५ हजार रुपयांचा टॅब आणि इतर महत्वाची कागदपत्रे लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


Web Title: Roads in the streets or vehicles; Just be careful!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.