मनमाड महाविद्यालयातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 05:02 PM2020-03-15T17:02:06+5:302020-03-15T17:02:30+5:30

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले.

 Road Safety Week by Manmad College | मनमाड महाविद्यालयातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह

मनमाड महाविद्यालयातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह

googlenewsNext

कार्यक्र माचा शुभारंभ प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे व मनमाड पोलिस स्टेशनचे पवार यांच्या उपस्थितीत झाला. बाजार समिती परिसरामध्ये नेहमी कांद्याच्या ट्रॅक्टरची वर्दळ असते. अशा ट्रॅक्टर व अन्य वाहनांना रा.से.यो. स्वयंसेवकांमार्फत रस्ता सुरक्षा संदर्भातले रेडियम लावण्यात आले. यावेळी विविध घोषणांनी रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी रा. से. यो. कार्यक्र म अधिकारी डॉ. पी. बी . परदेशी, प्रा . एन. ए. पाटील, प्रा. वर्षाराणी पेढेकर व योगेश सोन्नर आदिंसह प्राध्यापकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title:  Road Safety Week by Manmad College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.