Road less potholes in bus station | बसस्थानकात रस्ता कमी खड्डे जास्त
स्थानकाला गाळयुक्त पाण्यामुळे शिवाराचे स्वरूप तलावासारखे

ठळक मुद्देयेवला : प्रवाश्यांची कसरत ; डबक्यांमुळे परिसराला तलावाचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : येवला बस स्थानक नुतनीकरणाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले, मात्र बस स्थानकाच्या परिसरात असलेल्या खड्यांमधून पावसात व्यवस्थेचा ओढा वाहिल्याने स्थानकाला गाळयुक्त पाण्यामुळे शिवाराचे स्वरूप तलावासारखे झाले आहे.
त्याला जबाबदार असलेले ऐकमेकांवर चिखलफेक करून वेळ मारून नेत आहेत. तर लोकप्रतिनिधी व प्रवाशी संघटना त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष्य करीत असल्याने ग्रामस्थ आणि प्रवासी या परिस्थितीबद्दल नीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.
बसस्थानकावर २ कोटी २६ लाखातून तीन फलाट, काँक्र ीटीकरण, व्यवसायिक गाळे आदी कामे मंजूर झाली आहे. याकामांचे दिमाखात उद्घाटन झाले. मात्र पाऊस पडताच या बस स्थानकात खड्डे पडून बरीच डबकी तयार झाली. आणि त्याकडे वेळीच लक्ष्य न दिल्याने आता त्याच डबक्यांनी तलावाचे रुप धारण केल्याने प्रवाश्यांना कसरत करत जावे लागत आहे.
या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रवाश्यांना खड्यातील पाण्यातून मार्गक्र मण करावे लागत आहे. त्यामुळे काहीना खड्यांचे अंदाज न आल्याने अपघात देखील घडले आहे. येथील पाण्यातून बसमध्ये चढल्यानंतर प्रवाशांना नदी ओलांडल्याची प्रचिती येते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्यांनी स्थानकाला वेढा दिला असल्याने स्थानकाचा परिसर जलमय आणि कचºयाने गाळयुक्त झाला आहे. मागील पावसात अगदी पूर येवून गेल्यानंतरचे चित्र स्थानकात पाहवयास मिळाले. सध्या वाळूचे वाहन नदीतून बाहेर काढल्यासारखी बस या पाण्यातून स्थानकात आत-बाहेर न्यावी लागते.
प्रतिवर्षी दुरूस्ती, डागडुगी, काँक्र ीकीटकरणाचे टेंडर काढून थातूर-मातूर दुरूस्ती केली गेली. ती प्रत्यक्षात कमी अन् कागदावरच जास्त होत असल्याचे झालेल्या कामावरून दिसून येते. विशेष म्हणजे तालुक्याला तीन आमदार असून देखील हे चित्र कधी पालटणार अशी चर्चा प्रवाशी करीत आहे.
अनेकदा आंदोलने झाली. खड्यात वृक्षारोपण झाले. यावर केवळ मुरुमाचा मुलामा केला जातो आणि आणखीच परिस्थिती वाईट होत जाते. मुरुम टाकल्याने चिखल होतो व वाहने देखील फसतात. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी ग्रामस्थ आणि प्रवाश्यांकडून केली आहे.
 


Web Title: Road less potholes in bus station
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.