सिन्नर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 09:31 PM2020-10-27T21:31:25+5:302020-10-28T01:21:20+5:30

सिन्नर: आमदार माणिकराव कोकाटे यांनी माजीप्रा च्या कार्यलयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा शहासह भरतपूर, लक्ष्मणपूर, कोळगाव, मिरगाव, मिठसागरे, रामपूर या सात गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचा आरखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवावा तसेच वावीसह 11 गाव पाणीपुरवठा योजनेत घोटेवाडी व माळवाडी या गावांचा अंतर्भाव करण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या.

Review of water supply schemes in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा

सिन्नर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना आमदार माणिकराव कोकाटे. समवेत मजीप्रचे मुख्य अभियंता लांडगे, कार्यकारी अभियंता मोरे, जि. प. उपअभियंता घुगे यांच्यासह अधिकारी.

Next
ठळक मुद्देसिन्नर व इगतपुरी मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक

सिन्नर: आमदार माणिकराव कोकाटे यांनी माजीप्रा च्या कार्यलयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा शहासह भरतपूर, लक्ष्मणपूर, कोळगाव, मिरगाव, मिठसागरे, रामपूर या सात गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचा आरखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवावा तसेच वावीसह 11 गाव पाणीपुरवठा योजनेत घोटेवाडी व माळवाडी या गावांचा अंतर्भाव करण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या.
महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या नाशिकरोड येथील कार्यालयात सिन्नर व इगतपुरी मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक सोमवारी पार पडली. त्यावेळी आमदार कोकाटे बोलत होते. शहासह सात गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कडवा कालव्याच्या टेलला रामपूर-पुतळेवाडी शिवारात एमआय टँक अथवा पाझर तलावात उद्भव विहीर करण्याच्या सूचना आमदार कोकाटे यांनी केल्या. दरम्यान, भोजापूर धरणातून राबविण्यात आलेल्या मनेगावसह सोळा गावे पाणीपुरवठा योजनेत मनेगावसह पाटोळे, आटकवडे, देवपूरसह धारणगाव, भोकणी व बारागावपिंप्रीसह सात गावांच्या योजने गुळवंच व निमगाव सिन्नरला या गावांच्या स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. गुळवंचमधून दगडवाडीसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकून जलकुंभाचे बांधकाम करण्यात यावे आणि हिवरगाव, घंगाळवाडीला नव्या जलवाहिनी टाकून तिथ्लृेही जलकुंभ बांधण्यात यावा असेही आमदार कोकाटे यांनी सुचविले.
ज्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामाची मुदत संपली. मात्र काम अद्याप अपूर्ण आहे अशा ठिकाणी ठेकेदार किंवा अधिकारी यांना जबाबदार धरले जाईल. अडचणी असल्याच्या पोलिस बंदोबस्त घेऊन काम पूर्ण करा. जनतेचे पाण्यासाठी हाल होणार नाही. याकडे लक्ष द्या, अशा शब्दात त्यांनी अधिकार्‍यांना खडसावले. यावेळी मजीप्रचे मुख्य अभियंता लांडगे, कार्यकारी अभियंता मोरे, जि. प. उपअभियंता घुगे आदी उपस्थित होते.

Web Title: Review of water supply schemes in Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.