वाढत्या महागाईच्या निषेधार्थ महसूलमंत्र्यांची पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 01:12 AM2021-11-20T01:12:50+5:302021-11-20T01:13:20+5:30

महागाई व इंधन दरवाढीच्या विरोधात जनजागरण अभियानाच्या माध्यमातून काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (दि.१९) पदयात्रा काढली. या पदयात्रेत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या सभेत कॉंग्रेस सरकारच्या काळात पेट्रोलमध्ये पन्नास पैसे वाढले तर आंदोलन करणारे भाजपाचे कार्यकर्ते व नेते आता पन्नास रूपयांनी पेट्रोल वाढल्यानंतर कुठे तोंड लपवून बसले आहे, असा सवाल करत थोरात यांनी कृषी कायदे मागे घेतल्याने हा कष्टकरी शेतकऱ्यांचा विजय असल्याचे सांगितले.

Revenue Minister's march to protest rising inflation | वाढत्या महागाईच्या निषेधार्थ महसूलमंत्र्यांची पदयात्रा

महागाईच्या निषेधार्थ गोंदे येथे सभेत बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात. समवेत व्यासपीठावर कॉंग्रेस पदाधिकारी.

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र सरकारचा निषेध : थोरात यांचे भाजपवर प्रहार

वाडीवऱ्हे : महागाई व इंधन दरवाढीच्या विरोधात जनजागरण अभियानाच्या माध्यमातून काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (दि.१९) पदयात्रा काढली. या पदयात्रेत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या सभेत कॉंग्रेस सरकारच्या काळात पेट्रोलमध्ये पन्नास पैसे वाढले तर आंदोलन करणारे भाजपाचे कार्यकर्ते व नेते आता पन्नास रूपयांनी पेट्रोल वाढल्यानंतर कुठे तोंड लपवून बसले आहे, असा सवाल करत थोरात यांनी कृषी कायदे मागे घेतल्याने हा कष्टकरी शेतकऱ्यांचा विजय असल्याचे सांगितले.

थोरात यांनी पुढे सांगितले, घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल यांचे प्रचंड भाव वाढवून भाजप सरकारने गरिबांचे कंबरडे मोडले आहे. तब्बल एक वर्षापासून शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन केले. हे आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रकारे त्रास देण्याचे काम केले पण शेतकरी हटले नाहीत. शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम भाजपाने केले. अखेर पंतप्रधान मोदींनी आज माघार घेत तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा,गरीब जनतेचा विजय असल्याचेही थोरात यांनी सांगितले. यावेळी आमदार हिरामण खाेसकर यांनीही मनोगत व्यक्त करत शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली. सभेनंतर गोंदे दुमाला ते वाडीवऱ्हे पदयात्रा काढण्यात आली तर रात्री वाडीवऱ्हे येथे महागाईच्या निषेधार्थ जागरण गोंधळ कार्यक्रम करण्यात आला. शनिवारी (दि.२०) सकाळी वाडीवऱ्हेत प्रभात फेरी आणि चौक सभा घेण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे,माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक राहुल दिवे,माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाने, शरद आहेर, माजी जि. प.सदस्य संदीप गुळवे,कॉंग्रेस तालुका अध्यक्ष रामदास धांडे, भास्कर गुंजाळ, ज्ञानेश्वर काळे, कचरू शिंदे, महिला तालुकाध्यक्ष मनीषा मालुंजकर, पांडुरंग शिंदे, संपत काळे, राजाराम धोंगड़े, बाळू कुकडे आदींसह कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Revenue Minister's march to protest rising inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.