Replacement begins: 'Police' received five police chiefs in four months | बदलीप्रयोग सुरूच : ‘त्या’ पोलीस ठाण्याला चार महिन्यांत मिळाले पाच पोलीसप्रमुख
बदलीप्रयोग सुरूच : ‘त्या’ पोलीस ठाण्याला चार महिन्यांत मिळाले पाच पोलीसप्रमुख

ठळक मुद्दे महेंद्र चव्हाण यांच्याकडे आता इंदिरानगरची जबाबदारी

नाशिक : मागील चार महिन्यांत इंदिरानगर पोलीस ठाण्याने पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा अनुभव घेतला. एकाही पोलीस प्रमुखाला या पोलीस ठाण्याची हद्द समजून गुन्हेगारी नियंत्रणासाठी ‘प्लॅनिंग’ला वेळ मिळाला नाही. एकूणच वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या बदल्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्याला किमान तीन वर्षांसाठीतरी एखादा वरिष्ठ अधिकारी लाभेल का? असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्याची जॉगिंग ट्रॅक ते विल्होळी जकात नाका पर्यंत आहे यामध्ये इंदिरानगर राजीव नगर वडाळा गाव पाथर्डी गाव दामोदर नगर नरहरी नगर चेतना नगर राणे नगर ज्ञानेश्वर नगर पांडवनगरी सराफ नगर समर्थ नगर सार्थक नगर राजीव नगर झोपडपट्टी कवटेकर वाडी आदीसह परिसर येतो पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी, घरफोडी, हाणामारी सह विविध गुन्हे घडत असतात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची जबाबदारी असते. नव्याने आलेल्या पोलिस निरिक्षक हद्द समजून घेत नाही, तोच त्यांची बदली होते. महिनाभरापुर्वी आलेले हेमंत सोमवंशी यांना जेमतेम महिना पूर्ण होत नाही, तोच त्यांना पुन्हा त्यांच्या जुन्या सरकारवाड्यात पाठविण्यात आले आहे. महिनाभरानंतर सातत्याने होणाऱ्या या बदल्यांमुळे गुन्हेगारीवर विविध पोलीस ठाण्यात अंकुश कसा ठेवला जाईल याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. सोमवंशी यांच्या बदलीनंतर उपनगर पोलीस ठाणेप्रमुख महेंद्र चव्हाण यांच्याकडे आता इंदिरानगर पोलीसप्रमुखाची जबाबदारी आयुक्तालयाने सोपविली आहे.

नऊ वर्षात १५वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती अन् चौदांच्या बदल्या
इंदिरानगर पोलीस ठाण्यात मागील नऊ वर्षांमध्ये १५ अधिकाऱ्यांची वरिष्ठ पोलीस निरिक्षक म्हणून नियुक्ती केली गेली. त्यांच्यापैकी १४ अधिकाºयांची बदली केली गेली. त्यामुळे केवळ एक अधिकारी या पोलीस ठाण्यात आपला कार्यकाळ पूर्ण करू शकल्याचे दिसते. परिणामी इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वाढती गुन्हेगारी अद्याप नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 


Web Title: Replacement begins: 'Police' received five police chiefs in four months
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.