Relief of workers in industrial area to flood victims | औद्योगिक क्षेत्रातीली कामगारांची पूरग्रस्तांना मदत 
औद्योगिक क्षेत्रातीली कामगारांची पूरग्रस्तांना मदत 

नाशिक : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगलीत भीषण पूर परिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्धवस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पूनरर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असतान नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील सीएट कंपनीच्या  कामगारांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 
सातपूर येथील सीएट एम्प्लॉईज को-आॅपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीने गुरुवारी (दि.२३) पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा धनादेश दिला आहे.  सीएट एम्प्लॉईज को-आॅपरेटीव्ह क्रेडिट सोसाटीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सराकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पुढाकार घेऊन सोसायटीच्या सभासदांनी पुन्हा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. सोसायटीेच्या पदाधिकारी व सभासदांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना हा ५१ हजार रुपयांच्या मदतनिधीचा धनादेश सुपर्द केला आहे. यावेळी सोसायटीचे चेअरमन नितिन दवे, सहसचीव सागर शिंदे, युनियन अध्यक्ष भिवाजी भावले, सचीव  कैलास धात्रक, सोसायटीचे सचीव अंकुश कोडग, व्हाईस चेअरमन राजाराम ईखे,  खजिनदार भरत सांगळे, संचालक दशरथ चौबे, संचालक अरूण लांडगे संचालक योगेश दोंदे  संजय रासकर यांच्यासह सोसायटी कर्मचारी उपस्थित  होते.

 


Web Title: Relief of workers in industrial area to flood victims
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.