सुधारित नियमावलीबाबत रंगकर्मींसह सर्वांचाच नाराजीचा सूर कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:44 AM2019-08-25T00:44:49+5:302019-08-25T00:45:06+5:30

गतवर्षी सुधारित नियमावली लागू केल्यापासून नाट्य व्यावासायिक, हौशी रंगकर्मी, नाट्य परिषदेपासून ते कलाकारांपर्यंत असे नाट्य वर्तुळातील बहुतांश घटक या नियमावलीबाबत नाराज आहेत.

 Regardless of the revised rules, everyone is upset with the painters! | सुधारित नियमावलीबाबत रंगकर्मींसह सर्वांचाच नाराजीचा सूर कायम !

सुधारित नियमावलीबाबत रंगकर्मींसह सर्वांचाच नाराजीचा सूर कायम !

Next

नाशिक : गतवर्षी सुधारित नियमावली लागू केल्यापासून नाट्य व्यावासायिक, हौशी रंगकर्मी, नाट्य परिषदेपासून ते कलाकारांपर्यंत असे नाट्य वर्तुळातील बहुतांश घटक या नियमावलीबाबत नाराज आहेत. त्यामागे काही तांत्रिक बाबींबरोबरच दरवाढ हेच घटक कारणीभूत असले तरी दरवाढीनंतरही कालिदास आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत नसेल तर त्याबाबत काही वेगळे पर्याय शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
एकीकडे सुधारित नियमावली आल्यामुळे आर्थिक फटका बसत असल्याची नाट्य व्यावसायिकांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे कालिदासच्या उत्पन्नात सरासरी २० लाखांची घट झाली, हेदेखील वास्तव आहे. एका दृष्टीने बघितल्यास या दोन्ही बाबी परस्पर भिन्न असल्यासारखे भासते. मात्र, त्याचबरोबर त्यात काही संगती असल्याचेही दिसून येते. काही प्रमाणात झालेल्या दरवाढीमुळे नाटकांचे कमी झालेले प्रमाण, तसेच प्रत्यक्ष सभागृहात खानपान बंदी असल्याने शालेय गॅदरिंग, कंपन्यांचे गेट टुगेदर, पुरस्कार वितरण कालिदासमध्ये बंद असण्यासह कालिदासच्या अद्ययावततेबाबतची अनभिज्ञता या सर्व बाबींचा परिणाम कालिदासच्या उत्पन्नावर झाला आहे.
नाटकांच्या पूर्वतयारीसाठी नाटकापूर्वीच्या वेळेत वाढ, आॅफलाइन तारखा देणे, वाढीव भाड्यात कपात, लहानसहान उपकरणांसाठी आणि सुविधांसाठी स्वतंत्र शुल्क आकारू नये तसेच प्रत्येक वेळी अनामत शुल्क घेण्याऐवजी एकदाच अनामत रक्कम जमा करून घ्यावी यांसह अन्य काही मागण्या नाट्य व्यावसायिकांकडून महापालिकेला करण्यात आल्या आहेत. गत आठवड्यात प्रशांत दामले हे नाटकासाठी आले असतानाही त्यांच्या माध्यमातून निवेदन देऊन या मागण्या मांडण्यात आल्यावर आयुक्तांनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्यापही त्याबाबत काही निर्णय किंवा बैठका घेऊन तोडगा काढण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात आलेली नाहीत.
आर्थिक आत्मनिर्भरतेसाठी व्हावा विचार
जी संस्था, आस्थापना किंवा व्यवस्था आत्मनिर्भर असते, तीच प्रदीर्घ काळ सुव्यवस्थितपणे संचलनात राहते. ही बाब लक्षात घेऊनच यापुढे कालिदासबाबत विचार होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कालिदास आर्थिकदृष्ट्या अधिक स्वावलंबी कसे होईल, त्याबाबत नाट्यवर्तुळाशी निगडीत प्रत्येक घटकाशी स्वतंत्रपणे किंवा त्यांना एकत्रित करून काय करता येईल, त्याबाबत विचार होण्याची आवश्यकता आहे.

Web Title:  Regardless of the revised rules, everyone is upset with the painters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.