‘सायबर सुरक्षेच्या या म्हणी पाठ करुन घ्या, अन्यथा कप बशी फुटली अन्...’

By अझहर शेख | Published: August 11, 2020 02:01 PM2020-08-11T14:01:24+5:302020-08-11T14:05:53+5:30

सोशलमिडियाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र पोलीस दला’ने काही प्रबोधनपर गंमतीदार ‘सायबर सुरक्षा म्हणी’ पोस्ट केल्या आहेत. या म्हणी दिवसभर सोशलमिडियामध्ये व्हायरल होत होत्या.

‘Recite these cyber security sayings, otherwise the cup will explode ...’ | ‘सायबर सुरक्षेच्या या म्हणी पाठ करुन घ्या, अन्यथा कप बशी फुटली अन्...’

‘सायबर सुरक्षेच्या या म्हणी पाठ करुन घ्या, अन्यथा कप बशी फुटली अन्...’

googlenewsNext
ठळक मुद्देकप बशी फुटली अन् थोडक्यात हौस फिटलीआकर्षक ‘ऑफर’ देणारा इमेल: कामापुरता मामा.., स्वत:हुन इतरांना आपला ‘ओटीपी’ सांगता: एका हाताने टाळी वाजत नाही...

नाशिक : ‘सायबर सुरक्षेच्या या म्हणी पाठ करुन घ्या अन्यथा कप बशी फुटली अन् थोडक्यात हौस फिटली...’, आकर्षक ‘ऑफर’ देणारा इमेल: कामापुरता मामा.., जेव्हा तुम्ही स्वत:हुन इतरांना आपला ‘ओटीपी’ सांगता: एका हाताने टाळी वाजत नाही..., अशा गंमतीदारपणे राज्याच्या पोलीस दलाने प्रबोधनात्मक आगळ्यावेगळ्या काही म्हणी आपल्या टिवट्र अकाउंटवरून पोस्ट केल्या आहेत. या म्हणी नेटीझन्समध्ये मंगळवारी (दि.११) चांगल्याच चर्चेत आल्या.
सायबर गुन्हेगारांकडून देशभरात विविध शहरांमध्ये नागरिकांची हजारो ते लाखो रुपयांपर्यंत दररोज फसवणूक केली जात आहे. या आर्थिक फसवणुकीचा आकडा चक्रावून टाकणारा असून कोरोनाच्या संक्रमणामुळे लॉकडाऊ न काळात यामध्ये अधिकच वेगाने वाढ झाली. याबाबत ‘युनो’नेसुध्दा काही दिवसांपुर्वीच लक्ष वेधले होते. सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नागरिकांनी सापडू नये, यासाठी सोशलमिडियाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र पोलीस दला’ने काही प्रबोधनपर गंमतीदार ‘सायबर सुरक्षा म्हणी’ पोस्ट केल्या आहेत. या म्हणी दिवसभर सोशलमिडियामध्ये व्हायरल होत होत्या.
लॉकडाऊन काळात नाशिककरांना अशाच पध्दतीने सायबर गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या लढवून सुमारे ४ कोटी रुपयांपर्यंत गंडा घातल्याचे समोर आले आहे. एकूणच राज्यभरात अशा ऑनलाइनआर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांचा आकडा गंभीर आहे. हे गुन्हेगार शोधून गजाआड करणे पोलीस दलापुढेदेखील एक आव्हान आहे. गुन्हेगारांची परराज्यांमध्ये आढळून आलेली ‘लिंक’ त्यासाठी मर्यादा ठरते. तसेच विविध तांत्रिक अडचणींमुळेही या गुन्ह्यांच्या उकल होण्याचे प्रमाण नाशिकसह राज्यातील सर्वच शहरांमध्ये तसे अत्यल्प आहे.
नागरिकांनी सावधगिरी बाळगली तर ऑनलाइनआर्थिक गुन्हेगारीला आळा नक्कीच बसू शकतो, असा विश्वास पोलीस दलाकडून व्यक्त केला जातो. पोलिसांकडून ‘सायबर सुरक्षा’विषयी वेळोवेळी नागरिकांना सतर्क केले जाते. तसेच बॅँकांकडूनसुध्दा आपल्या ग्राहकांना लघुसंदेशाद्वारे याबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न होतो; मात्र असे असतानाही सायबर गुन्ह्यांमध्ये कुठल्याहीप्रकारची घट झाल्याचे अद्याप आढळून येत नाही.

Web Title: ‘Recite these cyber security sayings, otherwise the cup will explode ...’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.