शेतकरी प्रश्नावर राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 03:40 PM2020-09-24T15:40:07+5:302020-09-24T15:40:41+5:30

येवला : येथील विंचूर चौफुलीवर राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या वतीने शेतकरी प्रश्नावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

Rastaroko of Rashtriya Swarajya Sena on the question of farmers | शेतकरी प्रश्नावर राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा रास्तारोको

शेतकरी प्रश्नावर राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा रास्तारोको

Next
ठळक मुद्दे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक रस्त्यावर उतरले.

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : येथील विंचूर चौफुलीवर राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या वतीने शेतकरी प्रश्नावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, अवकाळी पावसाने शेत नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकरीऱ्यांना नुकसान भरपाई दयावी, यासाठी राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी बागल, राज्य अध्यक्ष संदीप पवार यांचे नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.
विंचूर चौफुलीवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारूळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सदर आंदोलनात राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे पवन चव्हाण, विकास बागल, दत्तात्रय पैठणकर, हर्ष म्हस्के, दतात्रय बोरनारे, विनोद गोतीस, आकाश भागवत, वैभव ढाकणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (फोटो आर एस एस)

Web Title: Rastaroko of Rashtriya Swarajya Sena on the question of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.