येवला महाविद्यालयात रंगले वेब काव्यसंमेलन

येवला महाविद्यालयात रंगले वेब काव्यसंमेलन

ठळक मुद्देकवितांना प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

येवला : येथिल महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला व वाणज्यि महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवानिमित्त बुधवारी, (दि. 30) वेब काव्य संमेलन चांगलेच रंगतदार झाले. यात शहर व परिसरातील निमंत्रित कवींचा सहभाग होता.
कवी संमेलनाचे उद्घाटन कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालय निमगावाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी विक्र म गायकवाड होते तर स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे उपस्थित होते. संमेलनात कवी लक्ष्मण बारहाते, प्रा. बाळासाहेब हिरे, विक्र म गायकवाड, अर्जुन कोकाटे, बाळासाहेब सोमासे, सचिन साताळकर, रतन पिंगट, प्रा. मनोहर पाचोरे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, प्रा. शरद पाडवी, शंकर अिहरे यांनी आपल्या कविता सादर केल्या. कवितांना प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कविसमेलनाचे सूत्रसंचालन कवी लक्ष्मण बारहाते यांनी केले तर डॉ. भाऊसाहेब गमे यांनी आभार मानले. संमेलन यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

 

Web Title: Rangle Web Poetry Conference at Yeola College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.