Ram Navami : नाशिकच्या काळाराम मंदिरात जन्मोत्सवाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 08:59 AM2021-04-21T08:59:00+5:302021-04-21T09:07:36+5:30

Ram Navami : मंदिराच्या स्थापनेपासून यंदा सलग दुसऱ्यांदा मंदिर रामनवमीला बंद असणार आहे.

Ram Navami: Preparations for birth anniversary at Kalaram temple in Nashik | Ram Navami : नाशिकच्या काळाराम मंदिरात जन्मोत्सवाची तयारी

Ram Navami : नाशिकच्या काळाराम मंदिरात जन्मोत्सवाची तयारी

googlenewsNext
ठळक मुद्देमंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे, तर श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींना देखील साजशृंगार करण्यात आला आहे.

नाशिक :  येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज रामनवमी उत्सव साजरा होत आहे. दरवर्षी हजारो भाविक हा जन्म सोहळा याची देखी अनुभवतात, मात्र यंदा देखील मंदिर बंद असल्याने भाविकांशिवाय रामजन्म सोहळा पार पडणार आहे. मंदिराच्या स्थापनेपासून यंदा सलग दुसऱ्यांदा मंदिर रामनवमीला बंद असणार आहे.

दरम्यान, आज भाविक नसले तरी मंदिरातील निवडक पुजाऱ्यांच्यावतीने पहाटेपासूनच महाअभिषेक पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे, तर श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींना देखील साजशृंगार करण्यात आला आहे.

दुपारी 12 वाजता यंदाचे मानकरी विलास बुवा पुजारी यांच्या हस्ते श्रीराम जन्म होणार असून यंदा सलग दुसऱ्या वर्षी हजारो नाशिककरांना घरी बसूनच ऑनलाईन हा जन्म सोहळा पाहावा लागणार आहे.



 

Web Title: Ram Navami: Preparations for birth anniversary at Kalaram temple in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.