Railways transported 25.46 million tonnes of goods | रेल्वेने केली 25.46 दशलक्ष टन मालाची वाहतूक

रेल्वेने केली 25.46 दशलक्ष टन मालाची वाहतूक

ठळक मुद्दे१ लाख ५०,२१२ कंटेनरच्या वॅगन आणि सुमारे २३,९७९ डी -आॅईल वाहतूक केली

नाशिकरोड : मध्य रेल्वेने लॉकडाउन व अनलॉक या सहा महिन्याच्या काळात मध्य रेल्वेने ४.८५ लाख वॅगनमधून २५.४६ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली.
रेल्वेने उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रांना वेळेवर माल पोहचण्यासाठी मालगाड्या पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवल्या आहेत.
लॉकडाऊन व अनलॉक २३ मार्च २०२० ते २३ सप्टेंबर २०२० या कालावधीत वीज केंद्रासाठी कोळशाच्या एक लाख ८३ हजार वॅगन तसेच शेतक-यांसाठी २२ हजार ६५२ वॅगन खते व ७,३२३ वॅगन कांदे वाहून नेले. पेट्रोलियमच्या ४७,३८४ वॅगन, लोखंड आणि स्टीलच्या १३,०५३ सिमेंटच्या ३१,२५१ वॅगन नेल्या. १ लाख ५०,२१२ कंटेनरच्या वॅगन आणि सुमारे २३,९७९ डी -आॅईल वाहतूक केली आहे.
२३ मार्च ते २३ सप्टेंबरपर्यंत ४ लाख ८५ हजार २०२ वॅगनची वाहतूक केली आहे. त्यात १० हजार १५० मालगाड्यांतून कोळसा, धान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड व स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर विविध वस्तू वाहून नेल्या. या कालावधीत दररोज सरासरी २,६२३ वॅगन माल भरला गेला.

Web Title: Railways transported 25.46 million tonnes of goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.