जोरदार संततधार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 01:13 AM2019-09-15T01:13:23+5:302019-09-15T01:13:45+5:30

पहाटेपासून सुरू झालेली संततधार शनिवारी (दि.१४) सायंकाळी उशिरापर्यंत टिकून होती. दिवसभरात सकाळी साडेअकरा वाजेनंतर दीड ते पावणे दोन तास काहीशी पावसाने विश्रांती घेतली, मात्र दुपारपासून सायंकाळपर्यंत पुन्हा जोर‘धार’ सुरू झाली. सायंकाळपर्यंत २८ मि.मी. इतका पाऊस पडला. दुपारी चार वाजेनंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाचा जोर वाढला. त्यामुळे धरणातून सुरू असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली.

Quite offspring ..! | जोरदार संततधार..!

गोदावरी नदीच्या पात्रातील दुतोंड्या मारुतीची मूर्ती अशी कमरेपर्यंत बुडाली.

googlenewsNext
ठळक मुद्दे२७.९ मि.मी. पाऊस । ‘गंगापूर’मधून २,५०० क्यूसेकचा विसर्ग; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : पहाटेपासून सुरू झालेली संततधार शनिवारी (दि.१४) सायंकाळी उशिरापर्यंत टिकून होती. दिवसभरात सकाळी साडेअकरा वाजेनंतर दीड ते पावणे दोन तास काहीशी पावसाने विश्रांती घेतली, मात्र दुपारपासून सायंकाळपर्यंत पुन्हा जोर‘धार’ सुरू झाली. सायंकाळपर्यंत २८ मि.मी. इतका पाऊस पडला. दुपारी चार वाजेनंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाचा जोर वाढला. त्यामुळे धरणातून सुरू असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेपासून धरणातून २ हजार ५६२ क्यूसेकचा विसर्ग गोदापात्रात सोडण्यात आला.
शहरात दिवसभर ढगाळ हवामान कायम राहिल्याने अधूनमधून हलक्या सरींचा वर्षाव पहाटेपासून सुरू झाला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत शहरात ९.६ मि.मी.पर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली. सकाळी साडेअकरा वाजेनंतर मात्र दोन तास पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे नागरिकांना दिवसभराची आवश्यक ती कामे आटोपता आली. बाजारपेठेत वर्दळ वाढून लगबग सुरू झाली, मात्र पुन्हा दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि जोरदार

Web Title: Quite offspring ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.