शहरातून गावात येणाऱ्यांना शाळांमध्ये क्वॉरण्टाइन करा : सीमंतिनी कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 09:36 PM2020-05-27T21:36:17+5:302020-05-27T23:51:48+5:30

सिन्नर : मुंबई-पुणे यांसारख्या कोरोनाबाधित क्षेत्रातून गावाकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला असून, परवानगीसह गावात येणाºयांना प्राथमिक शाळेत क्वॉरण्टाइन करा तसेच विनापरवानगी गावात येणाºयांवर गुन्हे दाखल करा अशा सूचना जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी अधिकाºयांना केल्या.

Quarantine those who come to the village from the city in schools: Seemantini Kokate | शहरातून गावात येणाऱ्यांना शाळांमध्ये क्वॉरण्टाइन करा : सीमंतिनी कोकाटे

शहरातून गावात येणाऱ्यांना शाळांमध्ये क्वॉरण्टाइन करा : सीमंतिनी कोकाटे

Next

सिन्नर : मुंबई-पुणे यांसारख्या कोरोनाबाधित क्षेत्रातून गावाकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला असून, परवानगीसह गावात येणाºयांना प्राथमिक शाळेत क्वॉरण्टाइन करा तसेच विनापरवानगी गावात येणाºयांवर गुन्हे दाखल करा अशा सूचना जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी अधिकाºयांना केल्या.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, वावीचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, मुख्याधिकारी संजय केदार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कोकाटे म्हणाल्या, कामगार तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी आपापल्या गावातच थांबावे, बाहेरगावातून गावात येणाºयांना एका खोलीत एक किंवा दोन अशा पद्धतीने होम क्वॉरण्टाइन करावे, घरात जागा नसल्यास गावच्या प्राथमिक शाळेत क्वॉरण्टाइन करावे, त्यांच्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था गावच्या स्तरावर करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. गुळवंचमध्ये १ मे पासून आजतागायत ९५ लोक बाहेरगावहून आले असून, त्यांच्याकडे परवानगी नसेल तर दोन दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले.
-----------------------
चौथ्या लॉकडाउनमध्ये शासनाने शिथिलता दिल्याने बºयाच अंशी दुकाने उघडली आहेत. तथापि संपूर्ण तालुक्यात दुकाने उघडण्याची व बंद करण्याची वेळ एकसमान असायला हवी, कंटेन्मेंट झोन सोडून तसेच गावात मास्क न लावता फिरणाºयांवर दंडात्मक कारवाई करा, दुकानदार वेळ पाळत नसतील तर दुकाने सील करा, ३१ मे नंतर लॉकडाउन उघडले तरी सर्वांना काळजी घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी स्वत: गावांमध्ये जाऊन पडताळणी करावी, हलगर्जी करणाºया अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Web Title: Quarantine those who come to the village from the city in schools: Seemantini Kokate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक