मालेगावमध्ये २७ पासून पल्स पोलिओ लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:29+5:302021-06-23T04:11:29+5:30

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. ...

Pulse polio vaccination from 27th in Malegaon | मालेगावमध्ये २७ पासून पल्स पोलिओ लसीकरण

मालेगावमध्ये २७ पासून पल्स पोलिओ लसीकरण

Next

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षण अधिकारी राजीव म्हसकर, नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अलका भावसार, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नांदापूरकर आदी उपस्थित होते.

मालेगाव तालुका व मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील शून्य ते पाच वयोगटातील ४२ हजार ६९२ बालकांना लसीकरण डोस देण्यात येणार आहे. त्याकरिता ३८८ बुथ-केंद्रे स्थापन करून ६७६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिओ बुथ केंद्रावर न येणाऱ्या बालकांना थेट घरी जाऊन पोलिओचे डोस दिले जाणार आहेत. त्याकरिता स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. अंतुर्लीकर यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाचा प्रभाव असतानाच्या कालावधीत पल्स् पोलिओ लसीकरण मोहीम होत असल्याने त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेतील कर्मचाऱ्यांना कोविड-१९च्या अनुषंगाने विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलिओ लसीकरण बुथवर एकाच वेळी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन लसीकरण बुथ मोकळ्या जागेवर लावण्यात येणार आहे. सामाजिक अंतराचे पालन करण्यात येणार आहे. बुथवर मास्क, हॅण्डवॉश, सॅनिटायझर यांची पुरेशी व्यवस्था ठेवून नियोजन करण्यात आले आहे.

अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी यांना देखील या मोहिमेत सहभागी करून घरोघरी भेटींद्वारे शून्य ते पाच वयोगटातील बालकांच्या जन्माची नोंदणी करण्यात येणार आहे. होर्डींग्ज, पोस्टर्स व बॅनर्सद्वारे या लसीकरण मोहिमेची जनजागृती करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

सदर पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने कृती दल गठित करण्यात येऊन नियोजनाबाबत आढावाही घेण्यात आला आहे. दुर्गम भगात ज्या ठिकाणी यंत्रणा पोहोचू शकत नाही, त्याकरिता मोबाईल टीमद्वारे संनियंत्रण करण्यात येणार आहे.

Web Title: Pulse polio vaccination from 27th in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.