हनुमान जयंतीदिनी घरात झाली पूजा, जप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 02:55 PM2020-04-08T14:55:59+5:302020-04-08T14:57:25+5:30

देवळालीगाव, जेलरोड आदी परिसरात हनुमान जन्मोत्सव साध्या परंतु पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. संचारबंदीमुळे भाविकांनी मंदिरांमध्ये जाण्याचे टाळले. अनेकांनी घरीच पूजाअर्चा करून जप केला.

 Puja, chanting took place at Hanuman Jayanti's house | हनुमान जयंतीदिनी घरात झाली पूजा, जप

हनुमान जयंतीदिनी घरात झाली पूजा, जप

googlenewsNext
ठळक मुद्देटाकळी येथील मठात हनुमान जन्मोत्सव भक्तांविनाच साजरा

नाशिकरोड : देवळालीगाव, जेलरोड आदी परिसरात हनुमान जन्मोत्सव साध्या परंतु पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. संचारबंदीमुळे भाविकांनी मंदिरांमध्ये जाण्याचे टाळले. अनेकांनी घरीच पूजाअर्चा करून जप केला.
देवळालीगावातील दक्षिणमुखी मारु ती मंदिर, श्री दंड्या हनुमान मंदिर, रोकडबोवाडी येथील रोकडोबा महाराज मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. देवी चौकातील लक्ष्मीनारायण मंदिर, गंधर्वनगरीतील हनुमान मंदिर, विहितगाव जय दादा दरबार मंदिर, सिन्नर फाटा हनुमान मंदिर, जेलरोडचे वीर सावरकरनगर, शिवाजीनगरचे मंदिर, लोखंडे मळा येथे पूजाअर्चा, महाआरती, पोथीवाचन करण्यात आले. यंदा संचारबंदीमुळे भाविकांनी मंदिरात न जाता घरीच पूजाअर्चा, जप केला.
समर्थ रामदास स्वामींनी भारतात सर्वप्रथम स्वहस्ते प्रतिष्ठापना केलेल्या टाकळी येथील मठात हनुमान जन्मोत्सव कोरोनाच्या महासंकटामुळे भक्तांविनाच साजरा झाला. विशेष म्हणजे महाआरतीचा व्हिडीओ तसेच महापूजेचा फोटो फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध करून असंख्य भाविकांना दर्शनाचा लाभ करून देण्यात आला. टाकळी देवस्थानचे पुजारी रमेश कुलकर्णी यांच्या हस्ते पहाटे संपूर्ण विधिवत पूजा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पोथी वाचन करण्यात आले. आरती करून नैवेद्य दाखविण्यात आला. मंगेश कुलकर्णी यांनी सहाय्य केले. कोरोनामुळे सध्या मठाचे मुख्य प्रवेशव्दार बंद करण्यात आलेले आहे.

Web Title:  Puja, chanting took place at Hanuman Jayanti's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.